esakal | शिक्षण विभागाची शाळांना तंबी... हे असं कराल तर...

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

ज्या शाळांनी विद्यार्थ्यांकडून वाहतूक शुल्क व ऑनलाइन शिक्षणासाठी अतिरिक्त शुल्क घेतले आहे, त्यांनी ते तत्काळ परत करावे.

शिक्षण विभागाची शाळांना तंबी... हे असं कराल तर...
sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः पूर्वप्राथमिकसह इयत्ता पहिली व दुसरीतील चिमुकल्यांच्या मनावर ऑनलाइन शिक्षणाचा भार नकोच, या निष्कर्षाप्रत शासन आले आहे. तशी तंबीही शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करावे, अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अनेक शहरांतील अनेक इंग्रजी माध्यम, खासगी विनाअनुदानित शाळांनी ऑनलाइन देणे सुरू केले होते. यासाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात होते; परंतु या ऑनलाइन शिक्षणाचा प्राथमिकच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना काहीही फायदा होत नसल्याचे समोर आल्यानंतर अनेक पालकांनी ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले; तसेच पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

मात्र शाळांकडून ऑनलाइन शिक्षण देणे सुरूच होते; तसेच या ऑनलाइन शिक्षणासाठी शाळांनी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केले होते. यासह मार्च, एप्रिल, मे व जून या महिन्यांत शाळांना सुट्या असूनही स्कूल बस वाहतुकीचा खर्चही वसूल केला होता. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत ‘सकाळ’ने पाठपुरावा करीत या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर याची दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक पत्र जारी करीत पूर्वप्राथमिक शिक्षण, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा वापर करू नये, असे कळविले आहे. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
 
मान्यता रद्द होणार 
संबंधित शाळांनी असे वर्ग तत्काळ बंद करावेत. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांकडून वाहतूक शुल्क व ऑनलाइन शिक्षणासाठी अतिरिक्त शुल्क घेतले आहे, त्यांनी ते तत्काळ परत करावे. याप्रकरणी शिक्षण विभागात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेविरुद्ध साथ रोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार शाळा मान्यता रद्द करण्यात येईल, असे पत्राद्वारे कळविले आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

टीव्ही, रेडिओच्या 
माध्यमातून द्या शिक्षण
 
कोरोना लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. तोपर्यंत पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी व इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा वापर न करता त्यांना टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्रम दाखवावेत. रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम ऐकवावेत, असे सूचित केले आहे.