esakal | शिक्षणातही ऑनलाइन बनवाबनवी
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्यासाठी शिक्षक आपल्या सवडीनुसार अभ्यास टाकतात. त्यातच शुल्कवसुलीबाबत मेसेजही टाकला जात आहे. या ऑनलाइन क्लासरूममुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढल्याचे दिसून येत आहे.

शिक्षणातही ऑनलाइन बनवाबनवी

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शाळांकडून शिक्षणाची बनवाबनवी सुरू आहे. या शाळांनी शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या व्हॉट्सॲप ग्रुपवर यूट्युब व्हिडिओ लिंक, पुस्तकांचे पीडीएफ टाकले जात आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्यासाठी शिक्षक आपल्या सवडीनुसार अभ्यास टाकतात. त्यातच शुल्कवसुलीबाबत मेसेजही टाकला जात आहे. या ऑनलाइन क्लासरूममुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढल्याचे दिसून येत आहे.
 
खासगीपासून सरकारी शाळांपर्यंत सर्वांनीच ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. परंतु या ऑनलाइन शिक्षणासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे न दिल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. शिक्षक आपल्या सोयीनुसार व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ, पीडीएफ फाइल टाकतात. वर्गावरील शिक्षकांच्या वेळेचे कोणतेही नियोजन त्यात नाही. बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेही टाइम टेबल दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. काही शाळांकडून सकाळी, दुपारी, सायंकाळी कधीही गृहपाठ पाठवला जातो. यामध्ये एकावेळी दोन ते तीन विषयांचा अभ्यास व्हॉट्सअॅपवर आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

झूम ॲपवर फक्त गोंधळ 
काही शाळांकडून गुगल मिट, झूम ॲपवरून ऑनलाइन शिकवण्यात येत आहे. एक तासाच्या कालावधीत विद्यार्थी जॉइन होण्यासाठीच किमान पंधरा मिनिटे लागतात. त्यानंतर शिकवायला सुरवात होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी झूम ॲपवर साउंड ऑन ठेवत असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना व्यवस्थित आवाज येत नाही. इंटरनेट स्पीड मिळत नसल्यामुळे अनेकदा व्हिडिओ अडकल्यामुळे मुलांना ऑनलाइनमधून बाहेर पडावे लागते. पुन्हा इंटरनेट कनेक्शन जोडून घेईपर्यंत शिक्षक शिकवत पुढे गेलेले असतात. त्यामुळे मुलांना काहीच कळत नाही. मुलांना काही समजले नाही किंवा प्रश्‍न पडले तर शिक्षकांना ते त्वरित कळवता येत नाही. शिकवलेले काहीच लिहून घेता येत नाही. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....
 
नेटवर्कसाठी गाठावा 
लागतो डोंगर 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड तालुक्यांतील अतिदुर्गम भागात कोणत्याच मोबाईल कंपनीला नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे मोबाईल असूनही नसल्यासारखा आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तब्बल एक ते दीड किलोमीटर पायी चालत डोंगरावर जावे लागते. डोंगरावर जाताना काटेरी झुडपे, साप, विंचू अशा विषारी प्राण्यांचीही भीती असल्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत धरून आज काय टाकले ग्रुपवर, हे शोधतात. मात्र, यूट्युब लिंक, पुस्तकांचीच कात्रणे पाहून मुलांची निराशा होते.