औरंगाबादेत आधी चौदा दिवसांत रुग्ण दुप्पट व्हायचे आता सव्वीस दिवसांत होतात ः राजेश टोपे  

File Photo
File Photo

औरंगाबाद ः औरंगाबादेत आधी चौदा दिवसांत रुग्ण दुप्पट व्हायचे. पण आता डबलिंग रेट २६ दिवसांवर गेला असुन पॉझिटीव्हीटी रेट आधी २६ टक्के होता. तो आता ११ टक्के झाला आहे. हा रेट १० टक्क्यांच्या आत आणायचे आमचे टार्गेट असुन त्याजवळ आम्ही आलो आहोत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (ता. २५) औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. टोपे म्हणाले, औरंगाबाद महापालिकेने उच्चांकी टेस्टींग केली. ॲन्टीजेन टेस्टची दररोजची क्षमता आता सात हजारापर्यंत पोचली आहे. 
जिल्ह्याचा डबलिंग रेट पुर्वी १४ दिवसांचा होता. रुग्ण १४ दिवसांत दुप्पट होत असे, आता २६ दिवसांत रुग्ण डबल होत आहे. हा राज्याच्या सरासरीएवढा रेट आहे. डबलिंग रेट आणखी सुधारण्यास वाव आहे. त्या अनुशंगाने प्रशासनाला सर्व सुचना देण्यात आल्या आहेत.
 
औरंगाबाद महापालिकेने एक लाख टेस्ट केल्या आहेत. त्याचा फायदा झाला असुन मोठ्या पद्धतीने जी पॉझिटीव्ह रुग्ण डिटेक्ट होत नव्हती ती तात्काळ डिटेक्ट झाली.

आजच्या बैठकीत उपचाराबाबतही मोठी चर्चा झाली असुन घाटी रुग्णालयात दोन महत्वाच्या मागण्या होत्या. त्यानुसार मल्टीस्पेशालिटी, सुपस्पेशालिटी हॉस्पिटल्सना लागणारे मनुष्यबळ व साधनसामग्रीसाठी समांतर व्यवस्था केली असुन या रुग्णालयातील सर्व पदे भरायला हवीत. नियमीतची पदे आम्ही लवकरच भरून घेत आहोत.

डॉक्टर्सची उपलब्धता वाढवुन कोवीड रुग्णांना डॉक्टर्सकडून योग्य त्या सेवा उपलब्ध करुन द्याव्या. त्यात कमतरता असु नये याबाबतही आम्ही सुचना दिल्याचे श्री. टोपे म्हणाले.

५०० रुग्णवाहिका होणार उपलब्ध
राज्यात रुग्णवाहिकेचा विषय प्रामुख्याने होता. रुग्णवाहिकी कमी पडल्या असे दिसुन आले. त्यासाठी धोरणच राबवित असुन नवीन ५०० रुग्णवाहिकासाठी टेंडर काढत आहोत. त्याची अंतीम प्रक्रीया सुरु आहे असे टोपे म्हणाले.  

रुग्णांकडुन अवाजवी बील आकारु नका -
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात ट्रस्ट रुग्णालयांनी बील आकारु नये. तसेच अवाजवी बीलेही आकारु नये यासाठी स्पष्ट सुचना दिल्या आहेत. ऑडीटरने बील तपासावे व नंतरच ते रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे. रुग्ण नातेवाइकांची तक्रार असता कामा नये.

महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत सेकंडरी व टर्शरी केअर महत्वाचा विषय आहे. या रुग्णालयात असिम्थेमॅटीक (लक्षणे नसलेले) रुग्णांनी आयसीयु, आक्सीजन बेडस अडवायला नको. ते आवश्‍यकता असलेल्या रुग्णांनाच मिळायला हवेत.

प्रशासनानेही असिम्थेमॅटीक रुग्णांना असे बेडची सुविधा देऊ नये त्यांच्यावर नियमाप्रमाणेच उपचार करावेत. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य रुग्णालयात मास्क, पीपीई किट व मास्कचे दर बीलात लावता कामा नये. अशा रुग्णालयांना पीपीई किट जिल्हाधिकाऱ्यांना पुरवायला हव्या. माहिती, शिक्षण व संवाद या माध्यमातून जनजागृती, सेल्फ डिसिप्लिनही नागरिकांनी पाळाव्यात असे टोपे म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com