esakal | CoronaVirus : हंगेरीत अडकलेला औरंगाबादचा विद्यार्थी गंभीर आजारी 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

-भारतात आणण्यासाठी विनंती,  
-दूतावास कार्यालयाने घतली दखल
-लवकरच परतण्याच्या अपेक्षा पल्लवीत 

CoronaVirus : हंगेरीत अडकलेला औरंगाबादचा विद्यार्थी गंभीर आजारी 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : शिक्षणासाठी हंगेरी या देशात असलेल्या औरंगाबादच्या तरुणाची लॉकडाउनमुळे मरणासन्न अवस्था झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अडकून पडलेला पृथ्वीराजसिंग राजपूत आजारी पडला आहे. रुग्णालयाने एक लाख रुपयाचे बिल हातात दिले; मात्र प्रकृती सुधारण्याऐवजी त्याला भारतात जाऊन उपचार करण्याचा सल्ला रुग्णालयाने दिला आहे. त्याची भारतात परतण्यासाठी धडपड सुरू आहे. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले असून, लवकरच त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय दुतावासाने दखल घेतली आहे. 

औरंगाबादेतील पर्यटन व्यावसायिक जसवंतसिंग यांचा मुलगा पृथ्वीराजसिंग हा हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे टुरिझम ॲण्ड केटरिंग मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आल्याने तो अडकून पडला आहे. त्याचे खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. असे असताना पृथ्वीराज सिंग यांची तब्येत बिघडली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लवकर औरंगाबादला परतावा

तो १८ मेरोजी रूममध्येच कोलमडून पडला. त्याने कसेबसे सावरत त्याच्या भोपाळ येथील हंगेरीत असलेला मित्र अक्षय मीना याला फोन करून मदत घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पृथ्वीराज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार-पाच दिवस ॲडमिट राहूनही त्याची प्रकृती सुधारली नाही, म्हणून त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष म्हणजे दुसऱ्या रुग्णालयानेही आजाराचे निदान तर केलेच नाही उलट एक लाख रुपयांचे बिल हातात दिले. पुरेशी प्रकृती सुधारण्यापूर्वीच सुटी दिली आणि मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पृथ्वीराजसिंग लवकरात लवकर औरंगाबादला परतावा अशा भावाना औरंगाबादकरांकडून व्यक्त होत आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मदतीसाठी धावा

आजारी अवस्थेत रूममध्ये एकटाच असलेला पृथ्वीराज सिंग मदतीसाठी धावा करत आहे. त्याचे वडील जसवंतसिंग यांनी थेट पंतप्रधान, विदेश मंत्रालय, हंगेरी येथील भारतीय दूतावास यासह सर्व संबंधितांकडे मदतीची याचना केली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

केद्र सरकारला विनंती

पृथ्वीराजसिंगच्या सुटकेसाठी माजी मंत्री सुरेश प्रभू, खासदार सुप्रिया सुळे, राजीव सातव, इम्तियाज जलील, उद्योजक राम भोगले, शिवसेनानेते चंद्रकांत खैरे, मानसिंग पवार, निरंजन छानवाल, नीलेश राऊत, यांच्यासह अनेकांनी केद्र सरकारला विनंती केली आहे. अखेर हंगेरीतील भारतीय दुतावासाने दखल घेतली आहे. येत्या ८ जुन रोजीच्या विमानाने भारतात आणण्याचे अश्वासन दिले आहे.