कोरोना ब्रेकिंग : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, औरंगाबादेत आज ९३ जण बाधित, आठ मृत्यू 

मनोज साखरे 
Tuesday, 16 June 2020

औरंगाबादेत १५ दिवसांत रुग्णवाढ सातत्याने होत असून आजही (ता. १६) जिल्ह्यात ९३  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आता एकूण रुग्ण संख्या २ हजार ९१८ झाली आहे. तर १४ व १५ जूनदरम्यान आठ जणांचे मृत्यू कोरोना आणि इतर व्याधींनी झाले आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादेत १५ दिवसांत रुग्णवाढ सातत्याने होत असून आजही (ता. १६) जिल्ह्यात ९३  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आता एकूण रुग्ण संख्या २ हजार ९१८ झाली आहे. तर १४ व १५ जूनदरम्यान आठ जणांचे मृत्यू कोरोना आणि इतर व्याधींनी झाले आहेत. 

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

औरंगाबादेत बाधित रुग्णांची वाढ होतच असल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही कस लागत असून १५४९  रुग्णआजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १२११ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
 

आज आढळलेले ९३ ल्या रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - 

मुकुंदवाडी (१), कैसर कॉलनी (१),  बेगमपुरा (२),  चेलीपुरा (१),  उस्मानपुरा (१),  रेहमानिया कॉलनी (१),  ईटखेडा (२),  चिखलठाणा (४),  वैजापुर (१),  गारखेडा परिसर (४),  खोकडपुरा (१),  न्यु विशाल नगर (१),  बायजीपुरा (१),  आंबेडकर नगर (२),  बंजारा कॉलनी (२),  एस.टी. कॉलनी (१), एन-९ सिडको (३), पुंडलिक नगर (३), छत्रपती नगर (२), जिन्सी राजा बाजार (२), शहानुरवाडी (११), जवाहर कॉलनी (११), जालान नगर (१), वडजे रेसिडेन्सी (१), सिल्क मिल कॉलनी (१), शिवाजीनगर (२), रोजा बाग दिल्ली गेट (२), बन्सीलाल नगर (१), बालाजी नगर (१), भाग्यनगर (३), कोहिनुर कॉलनी (१),एन-११ सिडको (३), जयभवानी नगर (१), गादीया विहार (२), दिवानदेवडी (१), सिडको (१), वाहेगाव (१), एन-११, टिव्ही सेंटर (१), शांतीपुरा, छावणी (१), रहिम नगर (१), प्रकाश नगर (१), बुध्द नगर (१), हडको, टिव्ही सेंटर (१), सुधाकर नगर (१), न्यु हनुमान नगर (१),दुधड (१), कानडगांव, ता. कन्नड (१), देवगांव रंगारी (१),लक्ष्मीनगर (१), वाळुज (१). यात  ५४ पुरूष  आणि ३९ महिला रुग्णांचा समावेश आहे.  

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

घाटीत पाच, खासगीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू 

१)  एन - सहा सिडकोतील ९० वर्षीय स्त्री रुग्णाचा १४ जून रोजी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. 

२) मंसुरी कॉलनीतील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा १५  जून रोजी पहाटे सव्वा चारला  मृत्यू झाला. 

३) १५ जूनला पहाटे पाच वाजता रोशन गेट येथील ५६ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला. 

४) १५ जूनला पहाटे सव्वा पाच वाजता शिवशंकर कॉलनीतील ७० वर्षीय समहिलेचा मृत्यू झाला. 

५) १५ जूनला बायजीपुऱ्यातील ७६ वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

खासगी रुग्णालयातील मृत्यू..

 ६) शहरातील एका खासगी रुग्णालयात बारी कॉलनी, रहीम नगरातील  ४० वर्षीय स्त्री रूग्णाचा १५ जूनला  सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. त्यांना १० जूनला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. १२ जूनला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

७)  असेफिया कॉलनीतील  ४७ वर्षीय पुरूष रुग्णाचा १५ जूनला सांयकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. त्याना १३ जूनला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

--

८)  एका खासगी रुग्णालयात जुना बाजार येथील ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

--

एकूण १५८ जणांचा मृत्यू -

 आतापर्यंत घाटीत ११६, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४१, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १५८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

-

कोरोना मीटर -

बरे झालेले रुग्ण - १५४९

उपचार घेणारे रुग्ण - १२११

एकूण मृत्यू  - १५८

आतापर्यंत बाधित रुग्ण - २९१८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid 19 Patient Positive In Aurangabad Maharashtra