esakal | औरंगाबादेत कोरोनाचा ३५ वा बळी, हिमायतबागच्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

शहरातील हिमायतनगर, हिमायतबाग येथील ६५ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे १९ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. अशी माहिती घाटीतील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. कोरोना व इतर आजाराचे ते औरंगाबादेतील ३५ वा बळी ठरले आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा ३५ वा बळी, हिमायतबागच्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : शहरातील हिमायतनगर, हिमायतबाग येथील ६५ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे १९ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. अशी माहिती घाटीतील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. कोरोना व इतर आजाराचे ते औरंगाबादेतील ३५ वा बळी ठरले आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

६५ वर्षीय रुग्णाला ताप आणि दम लागणे असा त्रास होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या चाचणीचा अहवाल १८ मे रोजी सकाळी साडेसात वाजता प्राप्त झाला. यात त्यांना कोविड -१९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दुपारी  जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. पण  त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.

त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घाटी रुग्णालय येथे भरती करण्यात आले. ऑक्सिजनचे कमी प्रमाण आणि रक्तदाबामुळे घाटी रुग्णालयातही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब हा आजार होता तसेच त्यांची बायपास सर्जरीही झाली होती. प्रकृती गंभीर आणि उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादेत कोरोनासुराचा कहर सुरूच@१०७३, आज ५१ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरातील सर्वच भागात कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत आहे. आज (ता. १९) सकाळी तब्बल ५१ रुग्णांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असून आता औरंगाबादची रुग्णसंख्या १०७३ झाली आहे. २७ एप्रिलपासून आजपर्यंत १०२० रुग्ण वाढले असूआधीच्या ४२ दिवसात  ५३ रुग्ण होते. हे विशेष! औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.१८) ६० रुग्ण आढळले. याच दिवशी हजाराचा टप्पा ओलांडला. आज (ता.१९) सकाळी ५१ रुग्ण वाढले असून दोन दिवसात १११ रुग्ण वाढले.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा