esakal | गुरुवारपासून बारावीच्या गुणपत्रिकांचे या पद्धतीने होणार वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यासाठी निकालाची अभिलेखे व मुळ गुणपत्रिका वाटप गुरुवारपासून (ता.३०) सुरु करण्यात येणार आहे.

गुरुवारपासून बारावीच्या गुणपत्रिकांचे या पद्धतीने होणार वाटप 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः बारावीच्या निकालाचे अभिलेखे व मुळ गुणपत्रिका जिल्हानिहाय ३० व ३१ जुलैला वाटपासाठीचे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. १६ जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात गुणपत्रिका मिळणे अपेक्षित होते. मात्र, निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी गुणपत्रिका न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाच्या प्रक्रिया रखडल्या होत्या. 

औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यासाठी निकालाची अभिलेखे व मुळ गुणपत्रिका वाटप गुरुवारपासून (ता.३०) सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा जिल्हानिहाय निश्‍चित केलेल्या वितरण केंद्रावरुन गुणपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयांना सकाळी दहा ते दोन यावेळेत वाटप करण्यात येणार आहे. निश्‍चित केलेल्या वेळेत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षेचे निकालाची अभिलेखे व मूळ गुणपत्रिका कनिष्ठ विद्यालयांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत घेवून जावे, असे आवाहन विभागीय मंडळातर्फे करण्यात आले. 

घरात इंटरनेटला स्पीड मिळत नाही का? हा उपाय करा...

असे होणार गुणपत्रकांचे वाटप 

- औरंगाबाद ः औरंगाबाद शहर व ग्रामीण, पैठण, खुलताबाद(विभागीय मंडळ), सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री (यशवंत कला महाविद्यालय), गंगापूर, वैजापूर (न्यू हायस्कूल लासूर स्टेशन) 

- बीड ः बीड शहर, माजलगाव, गेवराई, वडवणी (के. एस. के. कनिष्ठ महाविद्यालय, बीड), अंबाजोगाई, धारुर, परळी वैजनाथ, केज (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई), पाटोदा, शिरुर कासार, आष्ठी (वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा) 

यंदाही विद्यार्थ्यांना मिळणार दोन मोफत गणवेश...पण नियम मात्र बदलला...

जालना ः मंठा, जालना, अंबड, परतूर, घनसावंगी, बदनापूर (सिटीएमके गुजराती हायस्कूल,जालना), भोकरदन, जाफ्राबाद (रामेश्‍वर कनिष्ठ महाविद्यालय, भोकरदन), 

परभणी ः पुर्णा, परभणी (जि.प. कन्या प्रशाला, परभणी), जिंतुर, सेलू, पाथरी, मानवत (अरबिंदो कनिष्ठ महाविद्यालय, परभणी), गंगाखेड पालम, सोनपेठ (संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालय, गंगाखेड), 

बोर्डाने कॉपी प्रकणातील शिक्षेचे स्वरुप बदलले... अशी आहे नवीन नियमावली

हिंगोली ः औंढानागनाथ, हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत (माणिक मेमोरियल आर्य स्मारक हायस्कूल, हिंगोली)