वाणिज्य संस्था सुरू करा...पण हे नियम पाळा...

संदीप लांडगे
मंगळवार, 30 जून 2020

संस्थाचालक,विद्यार्थ्यांसहित संबंधित सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराचे आरोग्य कार्ड तयार करून शारिरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनंदिन नोंदी घेण्याचे आदेश 

औरंगाबाद ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने १८ मार्चपासून संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करुन राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी ते जून २०२० चे सत्र रद्द केले होते. एक जूनपासून संचारबंदीत शिथिलता दिल्याने शैक्षणिक संस्था सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संस्था सुरू करण्यासाठी संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग, लघुलेखन आदी शासकीय वाणिज्य संस्था अटींच्या अधिन राहुन एक जुलैपासून सुरु करण्यास उपसंचालक कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. 

राज्यातील वाणिज्य संस्थांनी जानेवारी ते जून सत्रातील विद्यार्थ्यांचे राहिलेले तास पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे. तसेच जिल्हा, तालुका, प्रशासन आरोग्य विभागाचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना फलक दर्शनी भागात लावावेत. उमेदवारासाठी प्रवेशाचा कालावधी १५ जुलैपर्यंत निश्चित करण्यात आला असून त्यासाठी गुगल फॉर्म विकसीत करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

संस्थाचालक,विद्यार्थ्यांसहित संबंधित सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराचे आरोग्य कार्ड तयार करून शारिरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनंदिन नोंदी घेण्याचे आदेश परीक्षा परीषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. याबाबत काही त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थेला जबाबदार धरत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

या आहेत महत्वाच्या अटी ः
१. जिल्हाधिकारी, तहसीलदार आपत्ती व्यपस्थापन समितीच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे, तसेच संस्था सुरु करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. 
२. टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम मान्यता व संचालन नियमानुसार सरावासाठी १२ बाय १२ चा हॉल ठेवून प्रत्येक संगणक, टंकलेखन यंत्रात किमान सात चौरस फूटाचे अंतर असावे. 
३. संस्थांनी हॉल सॅनेटाईज करावे, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी साबण तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करावे. 
४. दोन बॅचेसमध्ये किमान अर्धा तास अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल, संगणक व टंकलेखन सॅनिटाईज करावे. 
५. कोवीड १९ ची लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश देवू नये. 
६. शासन निर्धारीत केलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेवू नये. 
७. विद्यार्थ्यांना हॅण्डग्लोज, मास्क लावणे बंधनकारक करावे. 
८. हॉलमध्ये किमान पाच ते आठ उमेदवार, एक अध्यापकच उपस्थित राहील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Updates Start Commercial Education But follow Rules Aurangabad