esakal | अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी केली जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Countryside Pistol

अल्पवयीन बालकाकडून एक गावाठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल व मोटारसायकल (एमएच २० ईव्ही) असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी केली जप्त

sakal_logo
By
दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त) बालकाकडून एक गावाठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल व मोटारसायकल (एमएच २० ईव्ही) असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिकलठाणा पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (ता.दहा) वरुड काजी-गंगापूर जहागीर (ता.औरंगाबाद) रस्त्यावर केली. विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पोलिसांना वरुड काजी-गंगापूर जहागीर रस्त्यावरुन एक जण दुचाकीवरुन गावठी कट्टा घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार रस्त्यावर जाऊन ते थांबले असता एक विधीसंघर्षग्रस्त बालक जात होता. त्याला पोलिसांनी थांबवले असता त्याच्याकडून ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. तो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस महेश आंधळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलिस हवालदार अजित शेकडे, गणेश मुळे, पोलिस नाईक रविंद्र साळवे, पोलिस नाईक सोपान डकले, पोलिस काँस्टेबल दीपक सुरोशे, पोलिस काँस्टेबल आण्णा गावंडे, पोलिस नाईक देविदास सास्ते, दीपक देशमुख आदींनी केली आहे.

पाककलेतून तरुण अभियंत्याने साधली आर्थिक प्रगती, आईवडीलही लावतात हातभार


चिकलठाणा पोलिसांची दोन महिन्यांत ही दुसरी कारवाई आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झाल्टा फाट्याजवळ एका दुचाकीस्वाराकडुन सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी सहकाऱ्यांसह सिनेमा स्टाईल पाठलाग करत गावठी कट्टा व आरोपीला अटक केली होती. दिवसेंदिवस ग्रामीण भागात अल्पवयीन मुले बिनधास्त गावठी पिस्तूल किंवा तलवारीचा वापर करतं असल्याचे पुन्हा एकदा या कारवाईवरून दिसून येते आहे. मात्र पोलिसांचे यावर बारीक लक्ष असल्याने असल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा यावर वचक असल्याचे या कारवाई वरून दिसून येते आहे.

संपादन - गणेश पिटेकर

go to top