दाम्पत्याने जायकवाडीत उडी मारून केली आत्महत्या

चंद्रकांत तारू 
Saturday, 5 December 2020

जायकवाडी धरणाच्या पात्रात धरण नियंत्रण कक्षाच्या दोन किलोमीटर अंतरावर आज शनिवारी (ता.5) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक पुरुष व एक महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या वर्णनावरुन हे मृतदेह पती-पत्नी जोडप्याचे असल्याचे दिसुन येत असुन या पती-पत्नी जोडप्याने धरणात आत्महत्या केली असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे. या मृतदेहाजवळ एक मोबाईल व त्यात एक लिहलेली चिठ्ठी ही सापडली असुन यावरुन मृत दोघे पती पत्नी असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

पैठण : जायकवाडी धरणाच्या पात्रात धरण नियंत्रण कक्षाच्या दोन किलोमीटर अंतरावर आज शनिवारी (ता.5) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक पुरुष व एक महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या वर्णनावरुन हे मृतदेह पती-पत्नी जोडप्याचे असल्याचे दिसुन येत असुन या पती-पत्नी जोडप्याने धरणात आत्महत्या केली असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे. या मृतदेहाजवळ एक मोबाईल व त्यात एक लिहलेली चिठ्ठी ही सापडली असुन यावरुन मृत दोघे पती पत्नी असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या घटनेची माहिती जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातील तांत्रिक सहायक गणेश खराडकर यांनी पैठण पोलिस ठाण्यात कळविली असुन पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी ताताडीने जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. घटनास्थळी आत्महत्येपुर्वी धरणाच्या दगडाच्या पिचिंगवर बुट, चप्पल व पाण्याची बाटली खाद्यपदार्थ इत्यादी साहित्य ही आढळुन आले आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका काय आहे हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple commits suicide by jumping into Jayakwadi