भाऊबंदकीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून

किशोर  पाटील 
Sunday, 13 December 2020

ही घटना घडल्यानंतर घटनास्थळवरून धूम ठोकत आरोपी ज्ञानेश्वर याने स्वत दुपारी दीड वाजेच्या दरम्यान दौलताबाद पोलिस ठाण्यात हजर झाला.

दौलताबाद (जि.औरंगाबाद) : आसेगाव ( ता.गंगापूर) येथे भाऊबंदकीच्या वादातून पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात फावडे मारल्याने चुलत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (ता.१२) दुपारी घडली या घटनेनंतर पुतण्याने दौलताबाद पोलीस ठाणे गाठून पोलीस उपनिरीक्षक रवी कदम यांना घडलेल्या घटनेची हकीकत सांगितली. आसेगाव येथील दोन महिन्यात दुसरी खुनाची घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आसेगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर काळे (वय 30) याचे व त्याचे काका सुभाष काळे (वय 50) यांचे शनिवारी शेतातच जोरदार भांडण झाले. यात सुभाष यांच्या डोक्यात ज्ञानेशवर याने फावड़याने घाव घातला यात सुभाष काळे हे गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले. या आवाजाने बाजूला शेतात काम करत असलेले सुभाष यांच्या पत्नी मुले धावत घटनास्थळी आली. सुभाष यांची स्थिती पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला.

परिस्थितीवर मात करत अखेर चारही बहिणी होणार डॉक्टर

ही घटना घडल्यानंतर घटनास्थळवरून धूम ठोकत आरोपी ज्ञानेश्वर याने स्वत दुपारी दीड वाजेच्या दरम्यान दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस उप निरीक्षक रवी कदम यांना सदर घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिस पोलिस निरीक्षक राजश्री आडे, उप निरीक्षक रवी कदम,पोलिस अमलदार पी डी पचलोरे,डी बी तड़वी, रफीक पठान, शरद बच्छाव, निलेश पाटील, पोलीस पाटील कांबळे यानी घटनास्थळी धाव घेतली व नंतर मोबाइल फोरेंसिक लॅब पथक यांना घटना स्थळी पाचारण करून रक्ताने माखलेला फावड़ा जप्त करण्यात आले.

शरद पवारांच्या धाडसी निर्णयामुळेच भूकंपग्रस्त ५२ गावांना हक्काचे, पक्के घरे मिळाली

सुभाष काळे यांचा मुलगा राम सुभाष काळे याच्या फिर्यादी वरून दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजश्री आडे या करत आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cousin murdered in brotherly bondage dispute