esakal | दिलासादायक ; १३१ रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामधील दोन महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत; तसेच सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापक आणि आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) २२ तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात एक अशा एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. 

दिलासादायक ; १३१ रुग्णांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद :  जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) शुक्रवारी (ता. १७) कोरोना संशयित असलेल्या १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात गुरुवारी व शुक्रवारी (ता. १६ व १७) १३१ रुग्णांची कोविड-१९ ची तपासणी निगेटिव्ह आली. या रुग्णांना आवश्यक औषधींचा सल्ला देऊन शुक्रवारी घरी पाठवण्यात आले, अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यातील दोन महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत; तसेच सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापक आणि आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) २२ तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात एक अशा एकूण २४ कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मिनी घाटीत शुक्रवारी तपासण्यात करण्यात आलेल्यांपैकी ५२ जणांच्या लाळेचे नमुने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठवण्यात आले होते. १४ दिवस पूर्ण करणाऱ्या ९ रुग्णांचेही लाळेचे नमुने घेण्यात आलेले आहेत. सध्या रुग्णालयात १९ जणांना देखरेखीखाली ठेवलेले आहे, तर २३ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

 मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

घाटीत ३२ रुग्ण भरती, एक पॉझिटिव्ह 
घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत (दुपारी १२ वाजेपर्यंत) २५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सध्या ३२ कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. एक पॉझिटिव्ह रुग्ण आहे. १० जणांच्या लाळेचे नमुने तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली