
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) ५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ४७६ झाली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२९) ५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ४७६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ७९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ८२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : उल्कानगरी (४), कासलीवाल हौ. सोसायटी, सिडको (१), बालकृष्ण नगर, गारखेडा (१), जय भवानी नगर (१), चैतन्य हौ. सोसायटी (१),एन-४ सिडको (१), अन्य (४२)
ग्रामीण भागातील बाधित : तालवाडगाव, सिल्लोड (१), अन्य (६)
कोरोना मीटर
------
बरे झालेले रुग्ण - ४३८२७
उपचार घेणारे रुग्ण - ४५१
एकूण मृत्यू - ११९८
-------
आतापर्यंतचे बाधित - ४५४७६
-----
संपादन - गणेश पिटेकर