esakal | Corona Update : औरंगाबादेत ५९ जण कोरोनाबाधित, ५७९ रुग्णांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.२१)  ५९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

Corona Update : औरंगाबादेत ५९ जण कोरोनाबाधित, ५७९ रुग्णांवर उपचार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता.२१)  ५९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९७२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार २०४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहित जिल्हा प्रशासनाने दिली.शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : हरसिद्धी नगर (७), बजाज नगर (१), घाटी परिसर (१), मिल कॉर्नर (१), एन-६ सिडको (१),पुंडलिक नगर (१),बनेवाडी (१), रेल्वे स्टेशन (१),एन-८ सिडको (१), जहागिर कॉलनी (१), समतानगर (१), सेवा नगर (१), मुरलीधर नगर (२), उल्कानगरी (१), ओम नगरी, बीड बायपास (२), अन्य (३२)

ग्रामीण भागातील बाधित : सिल्लोड (१), अनय् (३)


तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत दर्जी बाजार, छावणीतील ७६ वर्षीय पुरूष, सुदर्शन नगरातील ५६ वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात ४४ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
--------------
बरे झालेले रुग्ण ः ४३२०४
उपचार घेणारे रुग्ण ः ५७८
एकूण मृत्यू ः ११८९
---------------
आतापर्यंतचे बाधित ः ४४९७२
------------------

Edited - Ganesh Pitekar