esakal | CoronaUpdate : औरंगाबादेत ६१ रुग्णांची भर, जिल्ह्यात सध्या ६७७ कोरोनाग्रस्तांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) एकूण ६१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या ४१ हजार १४० झाली.

CoronaUpdate : औरंगाबादेत ६१ रुग्णांची भर, जिल्ह्यात सध्या ६७७ कोरोनाग्रस्तांवर उपचार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) एकूण ६१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या ४१ हजार १४० झाली. सध्या ६७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बरे झालेल्या ७५ जणांना आज सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ५३, ग्रामीण भागातील २२ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत १ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील

शहरातील बाधित
परिसर (कंसात रुग्णसंख्या) ः घाटी परिसर (१), एन-८ सिडको (१), कांचनवाडी (१), जयनगर, उस्मानपुरा (१), एन-१३, भारतनगर (१), लोकशाही कॉलनी एन-४ (१), निराला बाजार (१), समर्थनगर (१), केळी बाजार (१), खडकेश्वर (१), राजनगर (१), बीडबायपास परिसर (२), घाटी परिसर (१), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (१), सिडको, एन सहा (१), नाईकनगर (१), न्यू शांतीनगर कॉलनी (१), अन्य (३४).

ग्रामीण भागातील बाधित
शेलगाव, गंगापूर (१), गंगापूर (१), नारायणगाव (१), बजाज नगर (१), वाकला, वैजापूर (१), सायगव्हाण, गंगापूर (१), अन्य (३).


मृतांची संख्या १ हजार १०७ वर
घाटी रुग्णालयात गारखेडा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा सोमवारी पहाटे साडेपाचच्या, सिडको एन-२ येथील ६० वर्षीय पुरुषाचा सकाळी नऊच्या, एकता कॉलनी, हिमायतबाग येथील ७२ वर्षीय पुरुषाचा दुपारी सव्वाच्या सुमारास मृत्यू झाला. भक्तीनगर, पिसादेवी रोड येथील ७० वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृतांची संख्या १ हजार १०७ वर पोचली आहे.

Edited - Ganesh Pitekar