esakal | Corona Update : औरंगाबादेत ६२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार १४६ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२०) एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ झाली.

Corona Update : औरंगाबादेत ६२ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४३ हजार १४६ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.२०) एकूण ६२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार १४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : समर्थ नगर (१), कासलीवाल मार्बल (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), सुंदरवाडी (२), एचएपी इंटरनॅशनल शाळा परिसर (२), गारखेडा (१), जबिंदा रेसिडन्सी (१), एन सहा संभाजी कॉलनी (१), अन्य (३१), एन वन सी सेक्टर (२), बेगमपुरा (२), इटखेडा (१), व्हीनस सो., बीड बायपास (२), साईश्रद्धा एन्क्लेव्ह नक्षत्रवाडी परिसर (१), दर्गा रोड परिसर (१),


ग्रामीण भागातील बाधित : पाचोड, पैठण (१), यसगाव, खुलताबाद (१), अन्य (१०)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत न्याय नगरातील ६० वर्षीय् स्त्री, खासगी रूग्णालयात सद्गुरू कृपा हाऊसिंग सोसायटीमधील ८७ वर्षीय पुरूष, सम्राट नगरातील ५८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
बरे झालेले - ४३१४६
उपचार घेणारे - ५८१
एकुण मृत्यू - ११८६
---
आतापर्यंतचे बाधित - ४४९१३
----

Edited - Ganesh Pitekar