
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.२३) ७८ जणांना सुटी देण्यात आली, तर दिवसभरात ७० नवीन कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.२३) ७८ जणांना सुटी देण्यात आली, तर दिवसभरात ७० नवीन कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आजपर्यंत ४३ हजार ३४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार१३४ झाली आहे. आतापर्यत १ हजार १९२ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ५९६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : मयूर पार्क (१), विजय नगर चौक (१), एन – १ सिडको (१), योगायोग सोसायटी एन-२ सिडको (१), एन -९ परिसर(१),एन ७, सिडको (१), गांधी नगर(१), न्यू शांतिनिकेतन कॉलनी(१), नंदनवन कॉलनी (१), उदय नगर (१), समर्थनगर(१), शिवाजी नगर(१), गुलमोहर कॉलनी, एन-५ सिडको(१), ठाकरे नगर(१), गारखेडा परिसर(१), रायगड नगर (२), नॅशनल कॉलनी (१), शिवेश्वर कॉलनी, हर्सूल(१), भावसिंगपुरा(१), एचआरएम हौसिंग परिसर(१), एमजीएम एन सहा (१), गजानन नगर (१), सुखसमृद्धी नगर (३), बीड बायपास (२), अन्य (२९) असे एकुण ५७ रुग्णांची वाढ झाली आहेत.
ग्रामीण भागात : छत्रपती शिवाजीनगर, सिल्लोड (१), अन्य (१२) असे एकुण १३ रुग्णांची वाढ झाली आहे.
संपादन - गणेश पिटेकर