Corona Update: औरंगाबादेत ८३ जणांना कोरोनाची लागण, दोन रुग्णांचा मृत्यू

corona1
corona1

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.६) दिवसभरात ७८ जणांना सुट्टी देण्यात आली. तर ८२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ३१ झाली आहे. तर आतापर्यंत एक हजार २११ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४७८ रुग्णांवर उपचार सुरू अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


 शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कंसात :   जयभवानी नगर (१), शिवशंकर कॉलनी (१), भाग्यनगर (१), सेंट लॉरेन्स स्कूल (१), बायजीपूरा (१), उस्मानपुरा (४), पैठण गेट (१),शहानूर वाडी (२), पडेगाव (१),एन सहा, सिडको (१), उल्कानगरी (१), पोद्दार इंटरनॅशनल स्कुल (२),जटवाडा (१), गुलमोहर कॉलनी (१),धूत हॉस्पिटल (३),सातारा परिसर (१),समर्थ नगर (१), शहानुरवाडी (१), नवजीवन हॉस्पिटल परिसर (१), सराफा भोवरी कोठडा (१), एन-४ सिडको (४), न्यु गणेश नगर (१), पुंडलिक नगर (१), महालक्ष्मी चौक (१), हर्सूल, टी. पॉईट (३), एन-८ (१), जिन्सी चौक (१), गारखेडा (१), अन्य (२६) असे एकूण ६६ रुग्ण वाढले आहे. रांजणगाव (१), पिंप्री राजा (१), वडगाव (१), अन्य (१३) अशा एकूण १६ रुग्णांची वाढ झाली आहे.



दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत तेलवाडीतील ४५ वर्षीय पुरूष, अल्तमश कॉलनीतील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोना मीटर
उपचार घेणारे-४७८
बरे झालेले---- ४४,३४२
मृत्यू----- १,२११
एकूण बाधित--४६,०३१

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com