esakal | Corona Update : औरंगाबादेत ८९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ९८७ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.१७) ८९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

Corona Update : औरंगाबादेत ८९ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४२ हजार ९८७ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी (ता.१७) ८९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ६९८ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८१ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४२ हजार ९८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) :

जवाहर कॉलनी (२), बीड बायपास (१), गुरूदत्त नगर (१), ज्योती नगर (१), बालाजी नगर (१), उत्तम नगर (१), एसबी सायन्स कॉलेज परिसर (२), जैन इंटरनॅशनल स्कूल परिसर (१), क्रांती चौक परिसर (१), एन सात सिडको (१), महेश नगर (१), एन नऊ पवन नगर (१), मुकुंदवाडी, अंबिका नगर (१), पद्मपुरा (१), जय भवानी नगर (२), अलोक नगर (४), घाटी परिसर (१), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (२), वेदांत नगर (१), एमआयटी हॉस्पीटल परिसर (१), अन्य (४६)

ग्रामीण भागातील बाधित : बाजार सावंगी, खुलताबाद (१), सावंगी (१), बाबरा, फुलंब्री (१), अन्य (१३)


घाटीतून सात रुग्णांना सुटी
घाटी रुग्णालयातून आज सात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यात जळगाव, चिकलठाणा, छत्रपतीनगर, सिडको एन-सात त्रिवेणीनगर, नवनाथनगर एन-११ हडको, खुलताबाद, धनदिरे महाराज मठ देवळगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २ हजार ५६५ जणांना घाटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.


कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ४२९८७
उपचार घेणारे रूग्ण : ५३३
एकुण मृत्यू : ११७८

Edited - Ganesh Pitekar