esakal | ऑक्सिजन प्लांट रखडला, आस्तिककुमार पांडेय यांची सही मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

1astik_20kumar_20pandey

चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ऑक्सिजन प्लांट रखडला, आस्तिककुमार पांडेय यांची सही मिळेना

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन चार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पण कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भातील फाईल महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची सही न झाल्याने अनेक दिवसांपासून पडून आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीत सुरू असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये तिनशे खाटांची व्यवस्था आहे. यातील सव्वाशे खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था आहे तर उर्वरित बेड साध्या पद्धतीचे आहेत.

मात्र कोविडच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर अचानक ऑक्सिजन बेडची मागणी वाढली होती. त्यामुळे कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटची संकल्पना पुढे आली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेला पुढाकार घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव दिला होता.

अनेक दिवस हा प्रस्ताव पडून होता. दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी चार कोटी पंचवीस लाखांचा निधी मंजूर केला. दरम्यान महापालिकेने ऑक्सिजन प्लांटसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. फक्त कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्याचे काम शिल्लक होते. मात्र अद्याप या फाईलवर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची सही झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रशासक मोठ-मोठ्या योजना मार्गी लावण्याच्या कामात गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहेत. त्यामुळे फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एक महिना गेला तरी वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे.

Edited - Ganesh Pitekar