
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) ९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) ९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ६४ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९१ जणांचा मृत्यू झाला. सध्या ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६४ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार २६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.
शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : शरनापुर, मिटमिटा (३), सैनिक कॉलनी, पडेगाव (२), मयुरपार्क (१), जय भवानी नगर (१), गणेश नगर (३), एन-२ सिडको (२), मुकुंदवाडी (४), पुंडलिक नगर (४), म्हाडा कॉलनी (१), वानखेडेनगर (१), विध्या नगर, सेवन हिल (१), देवळाई रोड (१), ठाकरे नगर, एन-२ सिडको (३), एन-६ सिडको (३), नारेगाव, माणिक नगर (२), हर्सूल टी पॉईंट (१), सातारा परिसर (१), दिशा नगरी, बीड बाय पास (१), किराडपुरा (१), पदमपुरा (१), राजाबाजार (१), शेंद्रा एमआयडीसी (१), रेल्वे स्टेशन परिसर(२), अन्य (३२), हनुमान नगर (१), कॅनॉट प्लेस (१), अभिमान सोसायटी (१),
ग्रामीण भागातील बाधित : चितेगाव (१), सिल्लोड (१), खुलताबाद (१), वडजी, डावरवाडी (१), अनय् (१२)
दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत भावसिंगपुरा येथील ७३ वर्षीय पुरूष व खासगी रुग्णालयात भानुदास नगर येथील ४४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
कोरोना मीटर
----------------
बरे झालेले रुग्ण ः ४३२६८
उपचार घेणारे रुग्ण ः ६०५
एकूण मृत्यू ः ११९१
----------------
आतापर्यंतचे बाधित ः ४५०६४
----------------
Edited - Ganesh Pitekar