esakal | औरंगाबादेत आज १०८ जण कोरोनाबाधित, सातशेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी (ता.पाच) एकूण १०८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबादेत आज १०८ जण कोरोनाबाधित, सातशेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी (ता.पाच) एकूण १०८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४० हजार ८४७ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ९९ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आज ५० जणांना सूटी झाली. यात शहरातील २८ व ग्रामीण भागातील २२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३९ हजार ४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सरकारची मान्यता, पण चित्रपटगृहे बंदच; डिजिटल प्रेक्षपणात अडचणी

शहरातील बाधित

हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (१), एन-दोन सिडको (१), अयोध्या नगर (२), पडेगाव (१), जाधववाडी (१), राजनगर, हर्सूल (१),कुटुर हाऊसिंग सोसायटी (१), टी. व्ही. सेंटर (१), मुकुंदवाडी पोलीस स्टेशन (१),साईनगर, सातारा परिसर (१), बीड बायपास (१), फुलेनगर, हर्सूल (१), घाटी परीसर (१), हनुमान नगर (१), एन तीन कामगार चौक (१), एन एक सिडको (१), अन्य (६२)

ग्रामीण भागातील बाधित

बजाज नगर (१), रांजणगाव, बजाज नगर (१), लासूर स्टेशन, गंगापूर (२), मनूर, वैजापूर (४), वाळूज (१), वाळूज महानगर (१), शिक्षक कॉलनी, वैजापूर (१), उपजिल्हा रुग्णालय परिसर, वैजापूर (२), अन्य (१६)

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या विरोधातील तक्रार आमदार पवारांनी घेतली मागे


कोरोना मीटर
--------
बरे झालेले रुग्ण  : ३९०४०
उपचार घेणारे रुग्ण  : ७०८
एकुण मृत्यू  : १०९९
------------
आतापर्यंतचे बाधित : ४०८४७
------------

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबादेत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृतांची संख्या हजार ९९ वर पोचली आहे. घाटीत पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील ८० वर्षीय तसेच सातारा परिसरातील ५५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

संपादन - गणेश पिटेकर