
औरंगाबादेत आतापर्यंत सहा महिन्यांतील सर्वात कमी शनिवारी (ता.२६) कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादेत आतापर्यंत सहा महिन्यांतील सर्वात कमी शनिवारी (ता.२६) कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज ३३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ३२२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६६ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४३ हजार ६१८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) : भवानी चौक (१), समृद्धी पार्क (१), एन चार सिडको (२), एसबीआय मुख्यालय परिसर (१), एन पाच सिडको (१), कौशल नगर, जालना रोड (१), अलोक नगर (२), मनपा परिसर (१), एल अँड टी कंपनी (१), एन अकरा मयूर पार्क (१), हनुमान नगर (१), अन्य (६)
ग्रामीण भागातील बाधित : माळीवाडा (१), वाळूज (१), बजाज नगर (२), अन्य (१०)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत ठाकरे नगरातील ७५ वर्षीय स्त्री, खासगी रूग्णालयात एन तीन सिडकोतील ६५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना मीटर
---------------
बरे झालेले रुग्ण ः ४३६१८
उपचार घेणारे रुग्ण ः ५०६
एकूण मृत्यू ः ११९८
---------------
आतापर्यंतचे बाधित ः ४५३२२
Edited - Ganesh Pitekar