तिने केला काॅल..नंतर आला मेसज आणि घडले काय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

गॅस बुकिंगचा एसएमएस येईल असे त्यांना वाटले होते. मात्र, त्यांना 9 हजार 999 रुपये बॅंक खात्यातून कपात झाल्याचा एसएमएस आला. गॅस बुकिंगसाठी 9 हजार 999 कसे गेले? म्हणून त्यांनी मोबाईल क्रमांक तपासला असता चुकीने दुसराच नंबर डायल झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतातच, महिलेने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.

औरंगाबाद- घरातील सिलिंडर संपल्याने एका महिलेने ऑनलाइन बुकिंगसाठी मोबाईलवरून नंबर लावला. समोरून त्यांना तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल व बुकिंग होईल, असे सांगण्यात आले. समोरून ओटीपी नंबरची विचारणा झाली. त्यांनी ओटीपी नंबर सांगताच तब्बल नऊ हजार 999 रुपये बॅंक खात्यातून कपात झाल्याचा मेसेज आला. नंतर लक्षात आले की, डायल केलेला नंबर गॅस एजन्सीचा नव्हे, तर सायबर भामट्याचा होता. त्यानंतर महिलेने गुरुवारी (ता. 26) सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. 

हेही वाचा -  सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

वेळ वाचविण्यासाठी सध्या सर्वजण ऑनलाइन बुकिंगचा वापर करीत आहेत. वीज बिल भरणे, गॅस बुकिंग, रेल्वे, विमान, बस तिकिटांचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे. शहरातील एका महिलेने गॅस बुकिंग करण्यासाठी गॅस एजन्सीला फोन केला; मात्र तो लागला सायबर भामट्याला. त्याने गॅस बुकिंगसाठी एक ओटीपी तुमच्या मोबाईलवर येईल व तुमचे बुकिंग मान्य होईल, असे सांगितले. काही वेळातच ओटीपी महिलेच्या मोबाईलवर आला. महिलेने ओटीपी नंबर त्या भामट्याला सांगितला.

गॅस बुकिंगचा एसएमएस येईल असे त्यांना वाटले होते. मात्र, त्यांना 9 हजार 999 रुपये बॅंक खात्यातून कपात झाल्याचा एसएमएस आला. गॅस बुकिंगसाठी 9 हजार 999 कसे गेले? म्हणून त्यांनी मोबाईल क्रमांक तपासला असता चुकीने दुसराच नंबर डायल झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतातच, महिलेने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅग लंपास करणाऱ्यांना कारागृहामधून घेतले ताब्यात 
घरासमोर पार्क केलेल्या कारमधून दोन लाख 40 हजार रुपयांची बॅग लंपास करणाऱ्या सहा संशयितांना हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत गुरुवारी (ता. 26) अटक केली. संशयितांना शनिवारपर्यंत (ता.28) पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहरकर यांनी दिले. या सहाही जणांनी यापूर्वीदेखील एका बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांची रवानगी पोलिस कोठडीनंतर हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.

जोसेफ नारायणा मेकला (वय 33), प्रकाश नारायणा मेकला (31), राजू नारायणा कोलम (27), राजू यादगिरी बोनाला (35), अशोक नारायणा कोंतम (23, सर्व रा. चेन्नइ, तामिळनाडू) व सुरेश अंजा बोनालू (27, रा. मारुतीनगर, विजयवाड, आंध्र प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. प्रकरणात सुरेश लक्ष्मण जुये (34, रा. एन-12, हडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अरे बाप रे - Video : असा गेला सहा जणांचा जीव, एक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cybercrime News