esakal | आयपीएल सट्टा सेंटरवरून रोज व्हायची पाच कोटींची उलाढाल, नेमले होते प्रशिक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

रोजाबाग येथील आयपीएल सट्टा कॉल सेंटर चालविण्यासाठी विदर्भात बसलेल्या एका ‘किंग’ने मुंबई येथील खास प्रशिक्षक नेमले होते. सट्टा लावलेला पैसा पेटीएम, गुगल पे आणि अन्य अ‍ॅपच्या माध्यमातून खात्यात कसा वळता करावा याचे प्रशिक्षण सेंटरमधील कामगार महिलांना दिले जात होते.

आयपीएल सट्टा सेंटरवरून रोज व्हायची पाच कोटींची उलाढाल, नेमले होते प्रशिक्षक

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : रोजाबाग येथील आयपीएल सट्टा कॉल सेंटर चालविण्यासाठी विदर्भात बसलेल्या एका ‘किंग’ने मुंबई येथील खास प्रशिक्षक नेमले होते. सट्टा लावलेला पैसा पेटीएम, गुगल पे आणि अन्य अ‍ॅपच्या माध्यमातून खात्यात कसा वळता करावा याचे प्रशिक्षण सेंटरमधील कामगार महिलांना दिले जात होते. प्रतिदिन चार ते पाच कोटींची उलाढाल सट्ट्यावर करण्यात येत होती. शिवाय हा सर्व पैसा विदर्भातील एका सट्टा ‘किंग’च्या खात्यावर वळता करण्यात येत होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

बोगस बियाणांच्या तक्रारीनंतर आता शेतातच तयार होणार सोयाबीनचे सरळ बियाणे!


सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोजाबाग येथील एका इमारतीत आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यासाठी थेट कॉल सेंटर थाटण्यात आले होते. या ठिकाणी शहरासह जालना, बीड, जळगाव, बुलडाणा आदी जिल्ह्यातील जुगारी ऑनलाइन सट्टा लावत होते. याबाबतची माहिती पोलिस आयुक्त डॉ़. निखिल गुप्ता यांना त्यांच्या विश्वासू खबऱ्याने गुरुवारी रात्री दिली होती. त्या आधारे रोजाबाग येथील कॉल सेंटरवर छापा मारून आठ महिलांसह दहा पुरुषांना अटक करण्यात आली होती.

मुंबईच्या दांपत्याकडे होती सूत्रे
चौकशीत महिला या कॉलवर सट्टा लावणाऱ्यांशी संपर्क करून त्यांचा दर घेण्यासह आलेला पैसा हा ऑनलाइन पद्धतीने विदर्भात बसलेल्या किंगच्या खात्यावर वळता करीत होत्या. यासाठी महिलांना खास प्रशिक्षण देण्यात आले होते. महिलांना सात हजार रुपये प्रतिमहिना दिला जात होता. मुंबई येथून आलेले एक दांपत्य सर्व सूत्र सांभाळत होते. या कॉल सेंटरची पाळेमुळे खणण्याचे काम सिटी चौक पोलिस करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar