CoronaVirus : व्हॉट्सॲप, फेसबुकने तारले : कुणाला ते वाचा

प्रकाश बनकर
Thursday, 23 April 2020

निफाडच्या तरुण शेतकऱ्यांचा पुढाकार, 

सोशल मीडियाच्या माध्यमातून 
विकतात रोज दोन टन द्राक्षे 

औरंगाबाद : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे; पण या परिस्थितीतूनही मार्ग काढत निफाड तालुक्यातील (जि. नाशिक) कोळवाडीच्या तरुण शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या दारापर्यंत पोचविली आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी व चांगला वापर केल्यास त्याचा फायदाही होतो. असाच वापर या दोन युवकांनी करत दरदिवशी दोन टन द्राक्ष विक्री करत आहे. या विक्रीतून नफा तर नाही किमान शेतीतील खर्च निघून थोडे पैसे हातात येतील याच उद्देशाने आम्ही हे करत असल्याचे तरुण शेतकरी वैभव पाटील यांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोळवाडीचा प्रशांत वारे यांची जेमतेम एक एकर शेती आहे. या शेतीत तो द्राक्षाचे पीक घेतो. दरवर्षी १० ते १२ लाखांचे उत्पन्न या पिकातून प्रशांत यांना होते. यंदा नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांनी केवळ दहा टक्केच पीक हाती लागले आहे. आणि त्यात आलेला लॉकडाउनमुळे काही हाताला लागणार नाही अशी परिस्थिती होती; मात्र मित्रांनी दिलेला सल्ला हा प्रशांत आणि वैभव यांच्या द्राक्ष विक्रीसाठी एक उपाय ठरला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वेगवेगळ्या व्हॉट्सॲप, फेसबुक ग्रुपवरून द्राक्षाची माहिती वेगवेगळ्या जिल्ह्यात द्या. ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून विक्री करा असा सल्ला या दोघांना त्यांच्या मित्रांनी दिला होता. त्यानुसार दोघांनी अकरा किलो द्राक्षे अडीचशे रुपयांप्रमाणे विक्री तीही आपल्या घरापर्यंत असा संदेश वेगवेगळ्या व्हॉट्सॲप तसेच फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यात शेअर केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

‘‘आम्ही दरदिवशी २०० बॉक्स वेगवेगळ्या शहरात विक्री करीत आहोत. म्हणजेच जवळपास दोन टन द्राक्ष रोज विक्री होते. बुधवारी (ता. २२) औरंगाबादेत दुपारपर्यंत १०० हून अधिक द्राक्षाच्या पेट्या विक्री केल्या. 
-वैभव पाटील, युवा शेतकरी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Two Ton Graps Sell Through Social Media