औरंगाबादेत शहर बस उद्यापासून रस्त्यावर, पहिल्याच दिवशी तिकीट दरवाढीने प्रवाशांचे ‘स्वागत’

0s4_0
0s4_0

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून बंद असलेली शहर बससेवा गुरुवारपासून (ता. पाच) सुरू होत आहे. तीन टप्प्यात बससेवा पूर्ववत होणार असून, पहिल्या टप्यात ३० बस सुरु होणार आहेत. प्रवाशांना पहिल्या दिवशी तिकीट दरवाढीने प्रवाशांचे पहिल्या दिवशी स्वागत होणार आहे. बसचा प्रारंभ महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता सिडको बसस्थानक येथे केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे तब्बल सात महिने बससेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यापूर्वी ९० बस रस्त्यावर उतरवल्या होत्या. आता गुरुवारपासून बस सेवा पुन्हा सुरू होत आहे.

नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेत विविध बदल करण्यात आले आहेत. तसेच प्रवास भाड्यात तब्बल ७ ते ९ टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी औरंगाबाद स्मार्ट सिटी बसचे प्रवास भाडे हे राज्यातील इतर बस सेवेच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असा दावा स्मार्ट सिटीच्या सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी केला. नव्याने बससेवा सुरू करताना ग्रामीण भागांना जोडणाऱ्या चार नवीन मार्गांवरही बस धावणार आहेत. यात मध्यवर्ती बसस्थानक ते बिडकीन, मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री, मध्यवर्ती बसस्थानक ते वेरूळ तसेच करमाड या चार मार्गांचा समावेश आहे.

मोबाइलवर दिसेल वेळापत्रक
शहर बससेवा अधिक स्मार्ट करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. बुधवारी स्मार्ट सिटी बसचे मोबाईल एप्लिकेशन जाहीर करण्यात आले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले-स्टोरवर उपलब्ध आहे. https://play.google.com/store/apps/details?id=io.ionic.aurangabaadsmartcity या लिंकवर क्लिक करून नागरिक हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात. या ॲप्लिकेशनवर बसचे वेळापत्रक, येण्या-जाण्याची अपेक्षित वेळ, मार्ग याची माहिती प्रवाशांना मिळेल, असा विश्वास प्रशासक श्री. पांडेय यांनी व्यक्‍त केला.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com