पिकाला पाणी देताना तरुण शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, आडुऴची घटना 

tarun shetkari.jpg
tarun shetkari.jpg

आडूळ (औरंगाबाद) : स्वता:च्या शेतातील कपाशी पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेला शेतकरी विद्युत मोटार चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेला. त्यावेळी पाय घसरुन त्याचा तोल गेल्याने शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आडुळ (ता.पैठण) शिवारात मंगळवारी (ता.२४) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. देविदास सारंगधर भावले असे मयत तरुण शेतकरयाचे नाव आहे.

पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास भावले हा शेतकरी आडूळ गावापासून तिन किलोमीटर अंतरावरील पिवळवाडी या शेतवस्तीवर आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. त्यांची शेती ही वाडी जवळच असल्याने ते मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एकटेच आपल्या स्वतःच्या मालकीची गट क्रमांक २१० मध्ये असलेल्या कपाशी पिकाला पाणी भरण्यासाठी गेले. विहिरीजवळ असलेले स्टॉटर चालु करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा विहिरीत तोल गेल्याने त्यांचा पाय घसरला व ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत त्यांचा बुडून मृत्यु झाला.

बराच वेळ झाला तरी देविदास हा घरी लवकर न परतल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध केली असता ते दिसले नाही त्यानंतर देविदासचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, भाऊसाहेब वाघ, अशोक भावले, भाऊसाहेब कोल्हे सह ग्रामस्थांनी मदतकार्य केले. बिट जमादार जगन्नाथ उबाळे, विश्वजित धनवे यांनी घटनेचा पंचनामा केला. आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मयत युवकाच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. देविदास भावले याच्या पार्थिवावर पिवळवाडी वस्तीवर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com