...असा आला काळविटाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले. 

चित्तेपिंपळगाव (जि. औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी (ता. औरंगाबाद) फाट्याजवळ शनिवारी (ता. ४) मध्यरात्री बीडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या  काळवीटाचा जागीच मूत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले. 

त्यांनी तत्काळ रस्यावर मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाला रस्त्याच्या कडेला आणून ठेवले आणि औरंगाबाद येथील वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

सकाळी साडे आठच्या सुमारास माहिती मिळूनही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आलेला नव्हता. यानंतर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी होत असल्याने, येथील युवकांनी वारंवार वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला. 

यानंतर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद येथील वन विभागाचे वाहन व वन कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले, मात्र स्थानिक वनपाल आलेच नाहीत. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

गावातील मधुकर भालेकर, रामहारी भालेकर, अनिल भालेकर, रामु डाके, अक्षय भालेकर, बळीराम भालेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदतकार्य केले. वनविभागाचे वाहन येईपर्यंत मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाजवळ  मोकाट कुत्र्यांच्या धाकाने दोन तीन तास थांबून होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटाचा मूत्यू झाल्याने वन्य प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News