अडीच दिवसाच्या 'त्या' सरकारविषयी फडणवीस म्हणाले..

devendra fadanveed.jpg
devendra fadanveed.jpg

औरंगाबाद : 23 नोव्हेबर 2019 रोजी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाने संपुर्ण महाराष्ट्रातील राजकारणात भुकंप झाला होता. त्याच फडणवीस सरकारच्या अडीच दिवसाच्या सरकारची आज वर्षपुर्ती आहे. त्याच्या बातम्या आता प्रसारमाध्यमे व सोशल मिडीयावर सुरु  आहेत. यावर फडणवीस यांनी अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात, तर येणाऱ्या काळात योग्यवेळी शपथ घेऊ असे सांगत फडणवीस यांनी यावर पडदा टाकला.ते औरंगाबादेत बोलत होते. 

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (ता.23) औरंगाबाद दौऱ्यावर आले असून औरंगाबादेत पदवीधर मतदार संघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेऴी त्यांनी अडीच दिवसाच्या सरकारच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. 

२३ नोव्हेंबरला शपथ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र केवळ अडिच दिवस हे सरकार टिकले होते. या अडीच दिवसाचे रहस्य लवकरच सांगेल असे त्यावेळी देवेद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आज त्या घटनेला वर्षपुर्ती झाली. 

भाजपला पदवीधरांची साथ 
भाजपने  शरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधराचे  प्रचंड मोठे समर्थन बोराळकरांना मिळत आहे. सहा वर्षापुर्वीच गोपीनाथ मुंडे यांनी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र दुदैवाने मुंडे साहेबांचे निधन झाले. त्यानंतर निवडणुकीच्या मानसिकतेत आमचे कोणतेच कार्यकर्ते नव्हते. यामुळे ६४ हजार मते घेऊन देखील बोराळकर यांचा पराभव झाला होता. आता संपुर्ण कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विविध संघटनांचे समर्थन मिळत आहे. संस्था, शिक्षक, वकील. डॉक्टर, भियंते, सीए यांचे समर्थन मिळत आहे. पदवीधराच्या संघटनाचा प्रचंड मोठा पाठिंबा भाजपला मिळत आहे. आत्ताच्या आमदारांविषयी प्रचंड नाराजी मराठवाड्यात पहायला मिळत आहे. 

मराठवाडा,विदर्भाकडे सरकारचे दुर्लक्ष 
महाविकास आघाडी सरकारचे केवळ काही ठरावीक भागाकडेच लक्ष आहे. मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे. यामुळे एक वर्षाच्या काळात मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांचा या भागात दौरा झालेला नाही. म्हणूनच सरकार विषयी जनतेत  मोठी नाराजी आहे. आमच्या काळात आमच्या अजेंड्यावर मराठवाडा प्राथमिकेतेने होता. औरंगाबाद शहराला १,६८० कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेला दिले. सिमेट रोडसाठी पैसे दिले. महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. मोठ्या प्रमाणात निधी दिला.

मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड आणि गोदावरी खोऱ्याचे पाण्याची योजना 

मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवत दुष्काळ मुक्त मराठवाडा झाला पाहिजे यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली होती. त्यातील ८ पैकी ६ जिल्ह्यचे टेंडर आम्ही काढले होते. दोन जिल्ह्याचे काम अंतिम टप्प्यात होते. त्याच्यावर महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. योजना रद्द केली. तर जनता आपल्या अंगावर येईल हे माहिती असल्यामुळे ती योजना कोमामध्ये टाकून द्यायची असाच प्रकार मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची सध्याची परिस्थिती आहे.

कोकणात समुद्रात वाहून जाणारे १३७ टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणून त्या ठिकाणी गोदावरीवर अवलंबून असलेला सगळा भाग पुर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प घेतला होता. गोदावरीचा एकात्मिक विकास आराखडा तयार करुन जलमंडळाची मान्यता काढत त्यांचा अंतीम परिपत्रक काढले होते. दुदैवाने त्याही प्रकल्पांना शितपेटीत  ठेवण्याचे काम या सरकारने केले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com