नामविस्तार दिनाला रामदास आठवले आलेच नाहीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी होणाऱ्या सभेला हजेरी लावणारे रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पहिल्यांदाच अनुपस्थिती जाणवली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये रामदास आठवले यांचे मोठे योगदान होते. 1994 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. तब्बल 17 वर्ष चाललेल्या लढ्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला.

तेव्हापासून प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी हजेरी लावत असतात.

हेही वाचा -या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

प्रत्येक वर्षी होणाऱ्या नामविस्तार दिन सोहळ्यामध्ये रामदास आठवले यांची जाहीर सभा ठरलेलीच होती. आजपर्यंत एकदाही न चुकता आठवले यांनी नामविस्तार दिनाची सभा घेतली आहे.

विदेशात असल्यामुळे गैरहजर

यंदा मात्र रामदास आठवले हे विदेशात असल्यामुळे, नामविस्तार दिनाच्या सभेला हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्यांदाच रिपाई नेत्यांना रामदास आठवले यांच्याशिवाय सभा घ्यावी लागली.

रिपाईचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. या सभेला मिलिंद शेळके राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, ब्रह्मानंद चव्हाण, पप्पू कागदे, भास्कर रोडे, संजय ठोकळ, सुनील मगरे, रवींद्र अवसरमल यांची उपस्थिती होती.

वाचून तर बघा : 

वाहतुकीचे धडे द्यायला चक्‍क यमराजा उतरलाय रस्त्यावर, नियमभंग करणाऱ्यासोबत सेल्फी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad Ramdas Athavle news