स्टाफ सिलेक्शनच्या परिक्षेत डमी परिक्षार्थी! डिजीटल कॉपी करताना पकडला 

मनोज साखरे
Saturday, 28 November 2020

‘स्टाफ सिलेक्शन कमीशन’ (एसएससी) च्या दिल्ली येथील पोलिस पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत परिक्षार्थ्याच्या जागी दुसराच तरुण देत असल्याचा प्रकार समोर आला. तो डिजीटल पद्धतीने कॉपी करताना आढळल्यानंतर ही बाब समोर आली. पोलिसांनी त्याला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. 

औरंगाबाद : ‘स्टाफ सिलेक्शन कमीशन’ (एसएससी) च्या दिल्ली येथील पोलिस पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत परिक्षार्थ्याच्या जागी दुसराच तरुण देत असल्याचा प्रकार समोर आला. तो डिजीटल पद्धतीने कॉपी करताना आढळल्यानंतर ही बाब समोर आली. पोलिसांनी त्याला अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, अर्जून बाबुलाल बिघोत असे संशयिताचे नाव आहे. स्टाफ सलेक्शन कमीशनमार्फत दिल्ली येथील पोलिस हवालदार पदांसाठी आज शहरातील आय ऑन डिजीटल झोन एमआयडीसी चिकलठाणा येथे परीक्षा होती. सकाळी सव्वानऊच्या सुमारास अर्जून बिघोत याचे ओळखपत्र तपासले जात असताना अमोल गडवे (मु. पो. केळगाव, ता. जि. औरंगाबाद) याच्या जागी तो परिक्षा देताना केंद्रावरील पर्यवेक्षकांना आढळला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यानंतर त्याची झडती घेतली असता एटीएम, ब्लुटुथ डिव्हाईस, इअर फोन तसेच पॉकेट व छिद्र असलेले साहित्य आढळले. पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेत अटक केली. पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले की, ‘‘संशयित अर्जून बिघोत अमोल गडवेच्या जागी परीक्षा देत होता. तो डिजीटल कॉपी करीत होता. त्याला समोरुन माहिती देणारी व्यक्ती निष्पन्न झाली आहे. तसेच अमोल गडवेचाही शोध घेत आहोत’.  

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dummy candidates in staff selection exam Aurangabad news