औरंगाबाद@८२४, आज ७४ पॉझिटिव्ह, अठराच दिवसात वाढले ७७१ रुग्ण !

मनोज साखरे
Friday, 15 May 2020

औरंगाबाद शहरात कोरोनाचा फैलाव आणि कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (ता. १५) तब्ब्ल ७४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८२४  झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाचा फैलाव आणि कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (ता. १५) तब्ब्ल ७४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८२४  झाली आहे.

मृत्यूचा आकडाही चिंताजनक असून तो २१ वर पोचला आहे. घाटीच्या लॅबमध्ये गुरुवारी (ता. १४) रोजी घेण्यात आलेल्या एकूण सॅम्पलपैकी २४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले ही सकारात्मक बाब आहे. परंतु दिवसेंदिवस शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. २७ एप्रिल ते १५ मे या काळातच ७७१ रुग्ण वाढले.

हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

१५ मार्च  ते २६ एप्रिल या काळात शहरात केवळ ५३ रुग्ण होते. या काळात रुग्णवाढीचा दर १.२६ प्रतिदिन होता. पण या अठरा दिवसातील दर ४२.८३ एवढा झाला. अर्थात शहरात या काळातील दर दिवशी ४२ रुग्ण बाधित होत आहेत.

या भागात आढळले रुग्ण
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (२), बुढीलेन (१), रोशन गेट (१), संजय नगर (१), सादात नगर (१), भीमनगर, भावसिंगपुरा (२), वसुंधरा कॉलनी (१), वृंदावन कॉलनी (३), न्याय नगर (७), कैलास नगर (१), पुंडलिक नगर (८),सिल्क मील कॉलनी (६), हिमायत नगर (५), चाऊस कॉलनी (१), भवानी नगर (४), हुसेन कॉलनी (१५), प्रकाश नगर (१) शिव कॉलनी गल्ली नं. ५, पुंडलिक नगर (१), हुसेन कॉलनी, गल्ली नं. ५ (२), रहेमानिया कॉलनी (२), बायजीपुरा (५), हनुमान नगर (१), हुसेन नगर (१), अमर सोसायटी (१), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.१, दुर्गा माता मंदिर (१) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

एकूण २३० जण कोरोनमुक्त
जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर मुकुंदवाडी येथील ५, नूर कॉलनी येथील ३, अशा आठ जणांना व घाटीतुन संजयनगर येथील एक महिला, तीन मूले, टाऊन हॉल येथील ७१ वर्षीय जेष्ठ नागरिक अशा पाच जणांना आणि मनपाच्या कोव्हीड केअर सेंटरमधून सात जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे गुरूवारी दिवसभरात २० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा आता २३० वर गेला आहे.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

घाटीत आणखी एकाचा मृत्यू; २१ वा बळी

जुना बाजार येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना १४ मे रोजी सायंकाळी सात वाजता मृत्यू झाला. नऊ मे रोजी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चा अहवाल देखील याच दिवशी पॉझिटिव्ह आला होता. दोन्ही फुफ्फुसात तीव्र निमोनिया व कोरोन या करणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६८ टक्क्यावर आले होते असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.

असे आहे कोरोना मिटर
उपचार घेणारे रुग्ण - ५७३
बरे झालेले रुग्ण -     २३०
एकूण मृत्यू     -       २१
एकूण रुग्णसंख्या -  ८२४

ब्लॉग - अस्वस्थ वर्तमान 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Hundread twenty Four CoronaVirus Positive Patient Aurangabad News