बनावट देशी दारू घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

प्रकाश बनकर
Friday, 25 December 2020

बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुरुवारी (ता.२४) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले.

औरंगाबाद : बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुरुवारी (ता.२४) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार ५६ दारूच्या सीलबंद बॉटल आणि वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी असे एकूण १० लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, औरंगाबादचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड

 

विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाहेगाव (ता. फुलंब्री) येथील पिपंळगाव वळण ते पिशोर रोडवरील डोंगरगाव चौफुलीवर सापळा रचण्यात आला. यात भाऊलाल देवचंद जऱ्हाडे उर्फ चिग्या (वय ३२) व सुरेश विल्सन घुले (वय १९, रा.नांदी ता. अंबड) हे दोघे चारचाकीने (एम एच १२ के जे ३९६६) बनावट देशी दारूच्या बाटल्या घेऊन जात होते. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक एम.एस. पतंगे, ए.जे. कुरैशी, ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.ए. महिंद्रकर, एस.आर. वाघचौरे, जी.बी. इंगळे, सय्यक दुय्यम निबंधक पी.डी. पूरी, ए. जी. शेंदरकर. जी.एन.नागवे, एस.एस.गुंजाळे,के.एस,ढाले,ए.के. जायभाये, व्ही.जी.चव्हाण, वाय.पी. कल्याणकर यांनी केली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake Liquor Carrier Catch, State Exercise Department Action Aurangabad News