एका ध्येयवेड्या तरुणाचा झपाटलेला 'प्रवास' !

भानुदास धामणे 
Saturday, 26 September 2020

वैजापूर तालुक्यातील फकिराबाद वाडी या अवघी ५०० लोकसंख्या असलेल्या छोट्या खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात विपुलचा जन्म झाला. घरी शेती बऱ्यापैकी होती; परंतु दुष्काळ पाचवीला पुजलेला. यावर विपुलने आपल्या बुद्धिच्या व अथक परिश्रमाच्या जोरावर स्थापत्य अभियंता ते नायब तहसीलदार असे यश संपादन केले आहे. जाणून घेऊया त्यांचा हा थक्क करणारा प्रवास.  

 

वैजापूर (औरंगाबाद) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये वैजापूर तालुक्यातील फकिराबाद वाडी येथील विपुल कडू पाटील गायकवाड याने घवघवीत यश संपादन करत नायब तहसीलदार पदावर आपले नाव कोरले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वैजापूर तालुक्यातील फकिराबाद वाडी या अवघी ५०० लोकसंख्या असलेल्या छोट्या खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात विपुलचा जन्म झाला. घरी शेती बऱ्यापैकी होती; परंतु दुष्काळ पाचवीला पुजलेला. २००४ नंतर नांदूरमध्यमेश्वर कालव्याला पाणी आल्यानंतर शेती बऱ्यापैकी पिकायला लागली अन् शिक्षणासाठी पैसाही उपलब्ध झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विपुलचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी विपुलला गावापासून २ किलोमीटर असलेल्या लाडगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये यावे लागायचे. दहावीत ८३ टक्के गुण मिळवून विपुलने त्याच्या हुशारीची चुणूक दाखवायला सुरवात केली. पुढे कोपरगाव येथील सद्‍गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी पास होत विपुलने पुन्हा एकदा छाप सोडली. पुढे नगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजमधून स्थापत्य अभियंता म्हणून पदवी घेतली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अभियंत्याच्या पदवीवर विपुलचे समाधान झाले नाही. पुढे आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी विपुलने पुणे गाठलं अन् सुरू झाला तो प्रवास.‌..‌ 
विपुलने २०१७ मध्ये लोकसेवा आयोगाची पीएसआयसाठी परीक्षा दिली, २०१८ मध्ये वन खात्याची परीक्षा दिली. या दोन्हीही वेळी मुलाखतीपर्यंत त्याने मजल मारली. मात्र पहिल्याच घासाला खडा लागावा तसे या परीक्षेत अपयश आले. तरीही या अपयशाला खचून न जाता पुन्हा २०१९ मध्ये आयोगाची परीक्षा दिली. यावेळी मात्र यशाने त्याच्या पायाशी लोटांगण घेतले आणि नायब तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली. 

‘‘अपयशाने खचून न जाता आत्मविश्वास आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी असेल, तर फक्त ५ ते ६ तास अभ्यास केला तरी यश संपादित करता येऊ शकते. ध्येय निश्चित करा यश हमखास मिळते.’’ 
-विपुल गायकवाड 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer son Success story achieve administrative officers rank