बळीराजाची बियाणे खरेदीची लगबग, तुरीच्या बीडीएन-७११ वाणाला सर्वाधिक पसंती

सुषेन जाधव
Saturday, 30 May 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधित खरीप बियाणे औरंगाबादेतील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र रोड येथे शेतकऱ्यांसाठी विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यापैकी तुरीच्या बिडीएन ७११ या वाणाला शेतकऱ्यांनी पसंती दिली असून दोनच दिवसात ४३८ बॅगा विक्री झाल्या आहेत.

औरंगाबाद: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संशोधित खरीप बियाणे औरंगाबादेतील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र रोड येथे शेतकऱ्यांसाठी विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यापैकी तुरीच्या बिडीएन ७११ या वाणाला शेतकऱ्यांनी पसंती दिली असून दोनच दिवसात ४३८ बॅगा विक्री झाल्या आहेत.

हे वाचलंत का? ६५ वर्षीय पत्नीला आधी काठीने मारले, पण जीव जाईना म्हणून...अखेर...

थोडथोडक्या बियाण्यासाठी औरंगाबाद जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परभणीला जावे लागत होते, त्यात पैसा व वेळची खर्च होत होता, ही गरज ओळखून केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी औरंगाबादेत बियाणे उपलब्ध करुन दिले आहे.

परभणी विद्यापीठातून बीडीएन ७११ या तूर बियाण्याच्या ५०० बॅगा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. सोबतच मूग बीएम २००३ - ०२ आणि खरीप ज्वारी नवीन सुधारित वाण परभणी शक्ती हे वाणही उपलब्ध करण्यात आल्याचे श्री. ठोंबरे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

शेतकरी रिकाम्या हाताने परत जाणार नाही

मागील दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या प्रतिकूल होते. २०१८ हे वर्ष अवर्षणाचे, तर २०१९ हे वर्ष उशिरा पर्यंत पडणाऱ्या पावसाचे होते. अशा परिस्थितीतही शेतकरी नगदी पिकाच्या मागे न लागता तूरीकडे कल होता. सध्या जेमतेम ६० बॅगा शिल्लक राहिल्या असून गरज पडल्यास विद्यापीठ प्रशासनास कळवून आणखी बियाणे मागवून घेण्यात येईल मात्र, एकाही शेतकऱ्यांना रिकाम्या हाताना माघारी जाऊ देणार नसल्याचेही श्री. ठोंबरे यांनी सांगितले.

खरेदीची लगबग सुरु

मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. बियाणे विक्री केंद्र येथे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रतिनिधिक स्वरुपात बियाणे विक्रीचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी फळबाग तज्ज्ञ डॉ. मोहनराव पाटील, डॉ. सु. बा.पवार, डॉ. के. टी. जाधव, डॉ. किशोर झाडे यांची शेतकऱ्यांना खरिप पिक लागवड व्यवस्थापन आदिवर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी बियाणे नोंदणीसाठी ९४२०४०६९०१ या क्रमांकावर फोन, व्हाटस ॲपद्वारे मागणी नोंदविण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Crowd For Purchasing Kharip Seed Aurangabad News