धावती का होईना देवेंद्र फडणवीसांचा औरंगाबाद दौरा, भाजप कार्यकर्त्यांची इच्छा झाली पूर्ण

गणेश पिटेकर
Thursday, 22 October 2020

अखेर भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबादेतील कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.२१) हसनाबादवाडी येथील डाळिंब फळबागेस धावती भेट देऊन नुकसान पाहणी केली.

औरंगाबाद : अखेर भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबादेतील कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.२१) हसनाबादवाडी येथील डाळिंब फळबागेस धावती भेट देऊन नुकसान पाहणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष सजनराव मते, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भावराव मुळे, तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, दामुअण्णा नवपुते, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाये, पंचायत समिती सदस्य अशोक साळुंके, रामकिसन भोसले, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सजनराव बागल यांच्यासह पक्षातील कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

पिक नुकसानाची माहिती देवेंद्र फडणवीस यांना देताना शेतकऱ्याला आश्रू झाले अनावर

फडणवीस यांच्या दौराची शनिवारपासून (ता.१७) पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली होती. काहींनी माध्यमांमध्ये बातमी दिली. बुधवारी फडणवीस यांची जालना येथील पत्रकार परिषद रद्द झाली. ती औरंगाबादेत घेण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून विरोधी पक्षनेते फडणवीस राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी दौऱ्यावर होते. त्यांचा बुधवारी दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. जालन्यात पाहणी करुन ते औरंगाबाद येथून विमानाने परतणार होते.

त्यांच्या अधिकृत दौऱ्याच्या नियोजनात औरंगाबादचा समावेश नव्हता. पण भाजप कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी अशी इच्छा असल्याने अनेकांनी त्याप्रमाणे तयार सुरु केली होती. त्या तयारीचे चिज झाले असे असे भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांना वाटल्याशिवाय राहिले नसेल. बुधवारी दिवसभर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या बातमीने माध्यमात जागा व्यापली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Devendra Fadanvis Visit Completed, BJP Workers Happy Aurangabad