औरंगाबादेत भाजप विरुद्ध भाजप संघर्ष!! खासदार कराडांच्या मुलांकडून कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

भाजपचे नवनियुक्त राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांचे मुलं हर्षवर्धन कराड व वरूण कराड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य कुणाल मराठे यांना शनिवारी (ता.२३) रात्री साडेदहा वाजता मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. यासंदर्भात मराठे यांच्या तक्रारीनुसार हर्षवर्धन कराड व त्यांच्या साथीदारा विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद: भाजपचे नवनियुक्त राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांचे मुलं हर्षवर्धन कराड व वरूण कराड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य कुणाल मराठे यांना शनिवारी (ता.२३) रात्री साडेदहा वाजता मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. यासंदर्भात मराठे यांच्या तक्रारीनुसार हर्षवर्धन कराड व त्यांच्या साथीदारा विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

कुणाल मराठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री १० वाजता कुणाल हा घरी जेवण असताना, खासदार भागवत कराड यांचा मुलगा हर्षवर्धन व वरूण कराड तसेच पवन सोनवणे हे घरी आले. तसेच ‘तू वार्डात फिरायचे नाही, लोकांना मदत करायची नाही, कुठलेही काम करायचे नाही’ असे बजावत आपल्यावर हल्ला चढवला तसेच शिवीगाळही केली.

काठीने मारहाण करीत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. कोटला  कॉलनीच्या वॉर्डातुन मला तिकीट मिळत असल्याने तसेच वार्डात मी लोकांना मदत करत असल्यानेच आपणाल या तिघांनी मला मारहाण केल्याचे कुणाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. हर्षवर्धन कराड यांच्याकडून मला व माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचेही कुणाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हर्षवर्धन व वरूण कराड, पवन सोनवणे यांच्याविरोधात मारहाण व धमकी दिल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

कोटला कॉलनी वार्डासाठीच आहे वाद
आगामी महापालिका निवडणूकीसाठी खासदार पुत्र हर्षवर्धन कराड यांनी कोटला कॉलनी वॉर्ड ६७ मधून तयारी सुरू केली आहे. याच वार्डातून कुणाल नितीन मराठे यांनीही गेल्या पाच-सहा महिन्यांपासून काम सुरू केले आहे. याच वार्डात कुणालने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्डात औषध फवारणी तसेच धान्य वाटप व इतर कामेही केली आहेत. या वार्डात कराड व मराठे यांच्यात तिकीटासाठी चढाओढही सुरू आहे. यासाठी भाजपच्या  वरिष्ठांपर्यंत दोघांनीही फील्डिंगही लावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याच वादावरूनच शनिवारी मारहाणीचा प्रकार झाल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली होती.

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR registerd Against BJP MP Karad's Son In the Matter of Beating BJP Activist