‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : औरंगाबादेत पहिल्याच दिवशी एवढ्या कुटुंबांचे सर्वेक्षण.

माधव इतबारे
Tuesday, 15 September 2020

कोरोनाचा संसर्ग व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम मंगळवारपासून (ता. १५) सुरू केली आहे. 

औरंगाबाद  ः कोरोनाचा संसर्ग व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम मंगळवारपासून (ता. १५) सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या ६७ पथकांनी पहिल्या दिवशी २२३८ घरांचे सर्वेक्षण करून नागरिकांची तपासणी केली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडमुक्त महाराष्ट्रसाठी जनजागरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तयारी करण्यात आली होती. सकाळी आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरवात झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका यांच्या ६७ पथकांनी सर्व नऊ प्रभागांत २२३८ घरांचे सर्वेक्षण करून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची थर्मलगन, ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first-day Survey of 2238 house Aurangabad News