सोयगाव एसटी आगारात फ्री-स्टाईल, सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, पाच जणांवर दंगलीचा गु्न्हा दाखल!  

soygav st.jpg
soygav st.jpg

सोयगाव (औरंगाबाद) : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन गावोगावी भ्रमंती करणाऱ्या एसटी परिवहनच्या सोयगाव आगारातच एसटी कर्मचाऱ्यांनी लाठ्या-काठ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (ता.22) पहाटे घडली. याप्रकरणी सुरक्षा रक्षकांच्या फिर्यादीवरून पाच एसटी कर्मचाऱ्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयगाव आगारातील या कर्मचाऱ्यांच्या दंगलीतील सुरक्षा रक्षक राणीदास सांडू चव्हाण (वय३७) हे गंभीर जखमी झाले असून तातडीने उपचारासाठी त्यांना जळगावला रवाना करण्यात आले आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव आगाराच्या प्रवेशद्वारातील सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण हा कर्तव्यावर असतांना तीन वाहक नावे प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे व चालक राजू बारी, राजेंद्र भोपे हे पाच जण पहाटे सात वाजताच आगाराकडे येत असतांना स्थानक प्रमुख कैलास बागुल यांनी सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांना सूचना देऊन या पाच जणांना आगारात प्रवेश देऊ नको अशा सूचना दिल्या. सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण यांनी या पाच जणांना प्रवेशद्वारात रोखले असता या पाचही जणांनी त्याचेवर प्राणघातक हल्ला चढवून चालक रघुनाथ बारी यांनी त्याचे हातातील काठी हिसकावून पाचही जणांनी लाठ्या-काठ्यांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे आगार परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी राणीदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांचे विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तातडीने निलंबनाचे आदेश
या प्रकरणी सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी तातडीने या दंगल प्रकरणाची माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक यांना पाठविली असता दुपार पर्यंत या पाचही जणांचे निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्यावरून आगार प्रमुख ठाकरे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून त्या पाचही जणांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

दंगलीचे पडसाद वाहतुकीवर

सोयगाव आगारात दंगलीची बातमी स्थानकावर पसरताच सोयगाव बस स्थानकात सन्नाटा पसरला होता. त्यामुळे एसटीच्या वाहतुकीवर पडसाद उमटले होते.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com