घाटी, दंत, कर्करोग रुग्णालयाचे जनऔषधी केंद्र अडकले लालफितीत

योगेश पायघन
Tuesday, 28 January 2020

औषधी तुटवड्याने रुग्ण त्रस्त ः घाटी, डीएमईआर, औषध प्रशासनाचा काना डोळा घाटीत रुग्णालयात भरती झाल्यावर सुई, सलाईनपासून ऑपरेशसाठी लागणारे सर्व सर्जिकल साहीत्य विकत आणावे लागते. 90 टक्के औषधींचा तुटवडा आहे. त्यात प्रशासन 40 टक्के औषधी असल्याचा दावा करते. प्रत्यक्षात मात्र, नोंदणी झालेल्या रुग्णांच्या हाती प्रिस्क्रीप्शन दिल्याशिवाय घाटीत उपचाराला पर्याय नाही.

औरंगाबाद - दोन वर्ष रेंगाळलेले जनऔषधी केंद्र जुलै 2019 मध्ये घाटी आणि कर्करोग रुग्णालयात सुरु करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डिएमईआर) संस्थांची नेमणुक केली. पुढे ती प्रक्रीया न्यायप्रविष्ठ झाली. न्यायालयानेही हे प्रकरण निकाली काढले. मात्र, अन्न औषध प्रशासन आणि डिएमईआरने याकडे काना डोळा केला. त्यामुळे चार महिन्यांपासून जनऔषध केंद्र लालफितीत अडकले असून घाटी रुग्णलयात औषध तुडवड्यामुळे त्रस्त रुग्णांना खाजगी मेडीकलची वाट धरावी लागत आहे.

घाटीतील जीवनधारा मेडीकल चालवण्यासाठी नेमलेल्या महाराष्ट्र कंन्झ्युमर फेडरेशनचा कंत्राट संपले. तरीही न्यायालयाचा निकाल, डीएमईआर व घाटीने सांगूनही व्हेंडरने साहित्य काढलेले नाही. यासंबंधी एक निकाल झालेला आहे. तर एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माहीती घेवून पुढील कारवाई करु असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. के. यु. झिने म्हणाले. तर शासकीय कर्करोग व दंत रुग्णालयाला मंजुर जन औषधी केंद्रही अद्याप सुरु झालेले नाही. 

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

लवकरच कारवाई 
ऑक्‍टोबर 2017 मध्ये डिएमईआरच्या संचालकांनी औषधी प्रशासनाच्या आयुक्तांना पत्र लिहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा खाली न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली. यावर औषध प्रशानाचे सहायक आयुक्त संजय काळे यांनी सांगितले, की संबंधीत संस्थेतील दोघांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यांचे उत्तर आले असून व्यक्तीशः सुनावणी केल्यावर लवकरच कारवाई होईल.

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

सुई, धाग्यापासून सर्व विकत 
घाटीत रुग्णालयात भरती झाल्यावर सुई, सलाईनपासून ऑपरेशसाठी लागणारे सर्व सर्जिकल साहीत्य विकत आणावे लागते. 90 टक्के औषधींचा तुटवडा आहे. त्यात प्रशासन 40 टक्के औषधी असल्याचा दावा करते. प्रत्यक्षात मात्र, नोंदणी झालेल्या रुग्णांच्या हाती प्रिस्क्रीप्शन दिल्याशिवाय घाटीत उपचाराला पर्याय नाही. सवलतीच्या नावाखाली सुरु असलेल्या जिवनधारा मेडीकलमध्ये अटी शर्तीतील शब्दांचा खेळ करुन शून्य ते पाच टक्के सवलत देवू केली जाते. ती त्या दुकानदाराच्या मनावर असल्याने खासगी मेडीकलमध्ये जिवनधारापेक्षा औषधी सर्जीकल साहीत्य मिळत असल्याचे अनेक प्रकरणे, तक्रारी समोर आल्या. 

रुग्णांचे आकडे बोलतात...
तपशिल --- 2018 ---- 2019 
बाह्यरुग्ण नोंदणी ः 6,51,333 ः 6,42,011 
आंतररुग्ण नोंदणी ः 98,218 ः 1,00802 
मोठ्या शस्त्रक्रीया ः 7749 ः 8773 
छोट्या शस्त्रक्रीया ः 15785ः 17874 
प्रसुती ः 16672 ः 19222 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghati, Dental, Cancer Hospital's generic medicine Centers Stuck