औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील कोरोना मृत्यू तांडव २०० वर, एकूण बळींची संख्या वाचा सविस्तर...!

प्रताप अवचार
Tuesday, 30 June 2020

एकट्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णापैकी आतापर्यंत तब्बल २०० जनांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित बळीची संख्या ही खाजगी रुग्णालय व मिनी घाटीतील आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयातील कोरोना मृत्यू तांडव दोनशे वर गेला आहे. 

औरंगाबाद : रविवारी ता.२८ पर्यंत औरंगाबाद शहरात एकूण २४७ जनांचा मृत्यू झाला. त्यात सोमवारी ता.२९ दिवसभरात आणखी दहा जनांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या २५७ वर गेली आहे. तर मंगळवारी ता.३० सकाळी आणखी दोन जनांचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या २५९ वर पोचली आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

यात विशेष बाब म्हणजे एकट्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णापैकी आतापर्यंत तब्बल २०० जनांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित बळीची संख्या ही खाजगी रुग्णालय व मिनी घाटीतील आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयातील कोरोना मृत्यू तांडव दोनशे वर गेला आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी ५ एप्रिल रोजी गेला होता. त्यानंतर कोरोना बळींची संख्या सातत्याने सुरूच राहिली. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर औरंगाबादेतील कोरोना मृत्यूचे प्रमाण देखील अन्य शहरांपेक्षा सर्वाधिक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  आरोग्यमंत्री राजेश टोपे , पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेतील प्रशासनावर कायमच नाराजी व्यक्त केली आहे. उपाययोजना करा असे नेहमीच सुनावले. आता प्रशासनाकडून उपाययोजनाकडे अधिक बारकाईने पाहणे सुरू झाले आहे. मात्र औरंगाबादेतील मृत्यू तांडव अध्यापही रोखण्यात यश मिळाले नाही. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

प्रमाण कमी दिसावे म्हणून दुसऱ्या दिवशी मृत्यू जाहीर 

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना मृरुची आकडेकरी लपविली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर प्रशासनाने जागे होत त्याचे पुरावा देऊन आम्ही पारदर्शी काम करीत असल्याचे दाखविले. तर औरंगाबादेत देखील ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच दिवशी मृत्यू जाहीर केला जात नाही. दोन दिवस तर कधी एक दिवस उशीरा मृत्यूची आकडेकरी जाहीर केली जाते. अर्थात कामाच्या सोयीसाठी ही पद्धत अवलंबली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर दिवसभरातील मृत्यूचा आकडा जास्त वाटू नये म्हणून ही शक्कल प्रशासन लढवीत आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

या वयोगटातील सर्वाधिक मृत्यू 

औरंगावदेत आतापर्यंत कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णामध्ये  वयोवृद्धांचा समावेश आहे. कोरोनामुळे त्याचबरोबर अन्य आजार अनेक वर्षांपासून जडलेल्या व्याधींनी रुग्णांचा बळी गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GMCH AURANGABAD CORONA DEATH 200