खुशखबर : कर्ज झाले स्वस्त ! व्याजदर कमी असलेल्या बँकांकडे ओढा.

प्रकाश बनकर
Thursday, 24 September 2020

सार्वजनिक बँकांना पसंती, संधीचा फायदा घेत कर्जाचे करतात ट्रान्सफर.  

औरंगाबाद : कोरोनामुळे देशावर आर्थिक संकट आले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक बँकांनी आता कर्जावरील व्याजदर कमी केला आहे. याचाच फायदा गृहकर्ज घेतलेले ग्राहक उचलत आहेत. ज्या बँकेचे व्याजदर कमी आहे, त्या बँकेकडे आपले कर्ज खाते ट्रान्स्फर करत आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र यासह विविध सार्वजनिक बँकांनी व्याजदरात मोठी कपात केली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी गृहकर्जावरील व्याजदर ८.४० टक्के होता. आता व्याजदर ६.९५ ते ७.२० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे खासगी बँकांमध्ये कर्ज घेतलेले ग्राहक आता या संधीचा फायदा घेत कर्ज ट्रान्स्फर करत आहेत. सध्या एसबीआय व्याजदर ६.९५ ते ७.२० टक्के, बँक ऑफ बडोदाचे व्याजदर ६.९५ ते ७ टक्के आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र व्याजदर ७.५ टक्क्यांवर आले आहे. शहरातील खासगी बँकांकडून कर्ज घेतलेले ग्राहक आता एसबीआय, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्रकडे वळत असल्याची माहिती वित्तीय सल्लागार माधव पाठक यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्राहकांची उत्कंठा वाढली 
गृहकर्ज व वाहन कर्ज स्वस्त झाल्याने नव्याने घर खरेदी करणाऱ्यांसाठी संधी आहे. शहर परिसरात सुरू असलेल्या दीडशेहून अधिक जास्त गृहप्रकल्पांना ग्राहकांच्या भेटी देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने काही घरांची बुकिंगही केली जात असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जाबिंदा यांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे कर्ज ट्रान्स्फर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या माध्यमातून वर्षाकाठी हजारो रुपयांचे व्याज वाचत आहे. व्याजदर कमी झाल्याने खासगी बँकेकडे असलेला कर्जदार हा सार्वजनिक बँकांकडे वळत आहे. 
-माधव पाठक, वित्तीय सल्लागार. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news public bank loans have become cheaper