
सर्व जागांचे निकाल जाहीर होताच येथे अभुतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
पाचोड (औरंगाबाद): राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान पा. भुमरे यांचे जन्मगाव असलेली व कायमस्वरूपी त्यांच्याच ताब्यातील मोठे उत्पन्न स्त्रोत असलेली पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात भुमरे यांनी निर्विवादपणे विजयीश्री मिळवून गावाचे सिंहासन स्वतःकडे राखले आहे. सर्वपक्ष एकटवूनही भूमरे यांनी विजय मिळवला आहे.
सर्व जागांचे निकाल जाहीर होताच येथे अभुतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला आहे. या निवडणुकीत मंत्री भुमरे यांचे बंधु राजुनाना भुमरे व पुतण्या शिवराज भुमरे रिंगणात होते, ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान पा. भुमरे यांचे जन्मगाव असलेली व कायमस्वरूपी त्यांच्याच ताब्यात असलेली पाचोड येथील ग्रामपंचायतीकडे जिल्हाचेच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या तीस वर्षापासून या ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे यांचे निर्विवादपणे वर्चस्व असून अनेक वर्षानंतर येथ अटीतटीची निवडणूक झाली होती.
भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा
वीस हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीकरीता ५००७ पैकी ३९९३ मतदारांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला होता. या ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागात सतरा जागांसाठी झालेल्या निवडणूकीत तीन जागांसाठी प्रतिस्पर्ध्यांना उमेदवार प्राप्त न झाल्याने त्या जागांवर मंत्री भुमरे यांच्या गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर इतर चौदा जागांसाठी प्रतिस्पर्धी स्वतः उमेदवार न मिळाल्याने दोन -दोन ठिकाणी रिंगणात उतरले होते.
चौदा जागांवर राजु आसाराम भुमरे, शिवराज राजु भुमरे, शिवाजी दामोधर भालसिंगे, सरिता अजय धारकर, अरुणा आनंद शेळके, राहुल लक्ष्मण नारळे, मनिषा पवन तारे, सावित्री वसंत भोजने, भागीत्राबाई उद्धव नरवडे, सुहाना सलीम शेख, रहीम करीम बागवान, भास्कर जनार्धन दळवी, रशिदाबी पाशू शेख, अर्चना अनिल भुमरे, दिनेश दिनकर घुले, दत्ता साहेबराव शेळके, सुभद्राबाई भिमराव खराद हे मंत्री भुमरे गटाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले.
भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पोटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव
मंत्री भुमरे यांच्या सख्य्खा मामाची मुले रणजित नरवडे, अॅड. रणवीर नरवडे व मामाची सुन सौ.करिष्मा नरवडे यांनी निवडणूकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून बंडाचा झेंडा हाती घेत निवडणूक रिंगणात मंत्री भुमरे यांचेविरुद्ध उडी घेतली होती. त्यामुळे त्याना अन्य पक्षही एकटवली गेली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. बद्रिनारायण भुमरे यांनी मंत्री भुमरे यांच्या गटाला शह देण्यासाठी आपल्या घरातुन भावजय सौ.मिनाताई भुमरे, पुतण्या पृथ्वीराज भुमरे यांना उभे केले होते ,तर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः महाविकास आघाडीचे ब्रीद झुगारत मंत्री भुमरे यांच्या गटाविरुद्ध एकत्र येऊन उमेदवार उभे केले होते.
ही ग्रामपंचायत निवडणूक मंत्री भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने त्यांना येथे काही काळ थांबावे लागले. गावाचे सिंहासन म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचा ताबा स्वतःकडे अबाधित ठेवण्यासाठी त्यांना नवखे उमेदवाराविरुद्ध आपला कस लावावा लागला हे नाकारूनही चालणार नाही. एकंदर मातब्बर, प्रस्थापितविरुद्ध नवखे असे चित्र पाचोड (ता पैठण) येथे पाहवयावस मिळाले. परतु मंत्री भुमरे यांनी प्रतिस्पर्ध्याना महत्त्व न देता त्यांचे अस्तित्व त्यांना कळू द्या म्हणत निवडणूक होऊ दया, मतदार जागरूक व विकास कामाला कौल देईल हे नेहमी सांगत निवडणूक रिंगणात आपले उमेदवार उभे केले होते व ते सर्व विजयी झाले, पाचोड परिसरातील विजयी ग्रामपंचायतीच्या उमेदवारानी मंत्री भुमरे यांची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याने पाचोडला सेना मेळाव्याचे स्वरूप आल्याचे पाहवयास मिळाले.
Corona Vaccination: लसीकरणानंतर किरकोळ त्रास; काही जणांना थंडीताप, मळमळ
मंत्री भुमरे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतनिहाय मतदारांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले ''पाचोडचा विजय अपेक्षित होता, नवीन काहीच नाही, माझेसाठी ही निवडणूक वाटली नाही. विरोधक गटाला जेव्हा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळाले नाही तेव्हा त्यांनी त्यांची लायकी समजून घ्यायला हवी होती, परंतु त्यांनी नशीब आजमावले, छान झाले, त्यांची औकात त्यांना कळाली. मी त्यांना निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी म्हणून विनंती करावी असे वाटत होते, परंतू त्यांच्या डोक्यातील हवा काढण्यासाठी निवडणूक होणे गरजेची होती व ती झाली मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली."
(edited by- pramod sarawale)