आई विरुद्ध मुलाच्या पॅनलमध्ये मुलाची बाजी; पंचरंगी लढतीत कोणालाही बहुमत नाही

संतोष शिंदे
Monday, 18 January 2021

निवडणुकीपूर्वी सत्ता ताब्यात असणाऱ्या माजी सरपंच नारायण मोकासे यांच्या लोकशक्ती ग्रामविकास पॅनलला यावेळी खातेसुद्धा उघडता आले नाही

पिशोर (औरंगाबाद): संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पिशोर ग्रामपंचायतीच्या पंचरंगी लढतीत कोणत्याही एका पॅनलला बहुमत मिळाले नाही. सहा प्रभागाच्या एकूण सतरा जागांसाठी एकूण पाच पॅनलचे 80 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

हर्षवर्धन जाधव समर्थक कै.रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनलला चार, संजनाताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनलला दोन, माजी सरपंच पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही ग्राम विकास पॅनलला सात, राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांच्या आदर्श परिवर्तन ग्रामविकास पॅनलला तीन व एक अपक्ष उमेदवार निवडून आले.

भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पोटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

निवडणुकीपूर्वी सत्ता ताब्यात असणाऱ्या माजी सरपंच नारायण मोकासे यांच्या लोकशक्ती ग्रामविकास पॅनलला यावेळी खातेसुद्धा उघडता आले नाही. बहुमताचा जादुई नऊ हा आकडा मात्र कोणत्याही पॅनलला गाठता आला नाही.

आई विरुद्ध मुलाच्या पॅनलमध्ये मारली मुलाने बाजी. चार विरुद्ध दोनने मारली बाजी-

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव आणि श्री. दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल समोरासमोर असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे वेधले गेले होते. यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या रायभानजी जाधव ग्रामविकास पॅनलने चार जागा तर संजनताई समर्थक पॅनलला दोन जागा मिळाल्या. एकंदरीत मुलाने चार विरुद्ध दोन फरकाने या लढाईत बाजी मारल्याचे म्हणता येईल.

भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा

प्रस्थापितांना धक्का..

यंदाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले. विद्यमान माजी सरपंच नारायण मोकासे व त्यांची नात कीर्ती मोकासे, माजी सरपंच पुंडलिक डहाके, माजी उपसरपंच नारायण जाधव, विद्यमान माजी सरपंच अरुण सोनवणे आदींचा प्रतिष्ठित उमेदवारांना पराभव धक्का बसला.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harshavardhan jadhav sanjana jadhav aditya aurangabad political news