लॉकडाऊन काळात हेल्परायडर्स रुग्णांना देणार जेवणाचे डबे

प्रकाश बनकर
शनिवार, 28 मार्च 2020

ट्सॲपवर मदत मागणारी चिठ्ठी आली. सावजी-तुपकरी हॉस्पिटलमध्ये परगावातील एक वृद्ध महिला व त्यांचा मुलगा दोन आठवड्यापासून अॅडमिट आहे; परंतु संचारबंदी काळात त्यांची मेस बंद पडली आहे. त्यामुळे अडचण झाल्याचे समजले.

औरंगाबाद, ता. २८ : लॉकडाऊनमुळे दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या जेवणाची अडचण झाली आहे. याविषयी काही जण सोशल मीडियावरून संदेश पाठवून मदत मागत आहेत. या गरजूंसाठी हेल्परायडर्स पुढे आले आहेत. या ग्रुपतर्फे शहरातील विविध दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. 

याविषयी हेल्परायडर्सचे संदीप कुलकर्णी म्हणाले, गुरुवारी (ता.२६) सकाळी मला व्हॉट्सॲपवर मदत मागणारी चिठ्ठी आली. सावजी-तुपकरी हॉस्पिटलमध्ये परगावातील एक वृद्ध महिला व त्यांचा मुलगा दोन आठवड्यापासून अॅडमिट आहे; परंतु संचारबंदी काळात त्यांची मेस बंद पडली आहे. त्यामुळे अडचण झाल्याचे समजले. त्यावर संबंधितांना तत्काळ कॉल करीत परिस्थिती समजून घेत २१ दिवस त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्याच भागात राहणारे हेल्परायडर्स समूहातील सदस्य शिल्पा चुडीवाल यांच्या माध्यमातून त्या वृद्ध महिलेला व त्यांच्या मुलाला दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे, याच पद्धतीने शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांना जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यासाठी रितेश जैन, पवन भिसे, विनोद रुकार, स्वप्नील चंदणे, अमित दायमा, रघुनाथ कलंत्री, भूषण कोळी, अभिषेक कादी, अमोल पाटील, सुधीर व्यास, जगदीश एरंडे, देवा मनगटे, शशांक चव्हाण, नीलेश चव्हाण, पराग धूत, आदित्य भाले, प्रसाद कस्तुरे, नीलेश सेवेकर, दत्ता चव्हाण, स्मिता नगरकर, किरण शर्मा, निनाद खोचे यांच्यासह इतर या उपक्रमात सहभागी आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help Rider Giving Lunch Box to Patient Aurangabad Corona News