भाव चांगला; पण उत्पादन नाही

प्रकाश बनकर
सोमवार, 6 जानेवारी 2020

परतीचा पाऊस होण्यापूर्वी 30 सप्टेंबरला मक्‍याला विक्रमी दोन हजार रुपये दर होता. त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसानंतर हा दर 50 टक्‍क्‍यांनी घटत तो 1 हजार 80 रुपयांवर आला. यामुळे परतीच्या पावसातून वाचलेली मका विक्री होईल की नाही, पुढे अजून पाऊस झाला तर या चिंतेतून शेतकऱ्यांनी पडेल त्या भावात विक्री केली.

औरंगाबाद: खरिपाच्या सुरवातीला मका पिकावर आलेल्या लष्करी अळीने शेतकऱ्यांना हैराण केले. त्यानंतर हातात आलेले पीक परतीच्या पावसाने हिरावून घेतले. परिणामी मोठे नुकसान झाले. अनेकांच्या शेतातील कणसाला पावसामुळे कोंब फुटले. काहींची मका काळवंडली. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्‍याची आवक घटली आहे. दरदिवशी पाच ते सहा हजार क्‍विंटल आवक ही सध्या केवळ 400 ते 500 क्‍विंटलपर्यंत आली आहे. सध्या दर चांगला असला तरी मक्‍याची आवक घटल्याने बाजार समितीत शुकशुकाट दिसून येत आहे. 

परतीचा पाऊस होण्यापूर्वी 30 सप्टेंबरला मक्‍याला विक्रमी दोन हजार रुपये दर होता. त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसानंतर हा दर 50 टक्‍क्‍यांनी घटत तो 1 हजार 80 रुपयांवर आला. यामुळे परतीच्या पावसातून वाचलेली मका विक्री होईल की नाही, पुढे अजून पाऊस झाला तर या चिंतेतून शेतकऱ्यांनी पडेल त्या भावात विक्री केली.

क्लिक कराएकाच मांडवात साडे आठशे मुलींचे नामकरण

कवडीमोल दरात मका विक्री

ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मक्‍याला 1 हजार 400 रुपयांचा दर मिळाला. भाव चांगला असला तरी मका काळवंडलेली आणि कोंब फुटलेली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पडेल भावात खरेदी केली. सध्या मक्‍याला 1 हजार 700 रुपयांचा दर मिळत आहे; पण परतीचा पाऊस थांबल्यानंतर पहिल्या आठवड्यात हा दर मिळाला नाही. त्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात मका विक्री केली. 

वाचा - पत्नीला पाठवले नाही, सासूला जिवंत जाळले

अनेकांचा निघाला नाही उत्पादन खर्चही 

औरंगाबाद जिल्हा मक्‍याचे हब म्हणून ओळखला जातो. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मक्‍याचे मोठे पीक घेतले जाते. यंदा एकूण क्षेत्रापैकी 40 टक्‍क्‍यांहून अधिक हेक्‍टरवर मक्‍याची पेरणी झाली. जनावरांना चारा आणि चांगले उत्पन्न असा दुहेरी फायदा मक्‍यापासून होत असल्यामुळे या पिकाला प्राधान्य दिले जाते; पण यंदा परतीच्या पावसामुळे मक्‍याचे नुकसान झाले. पावसामुळे काहींचा मका पूर्णपणे सडून गेला. त्यातून जेही थोडेफार पीक वाचले त्याच्या विक्रीतून अनेकांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. 
हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

तारीख मक्‍याची आवक दर 
30 सप्टेंबर 3 क्‍विंटल दोन हजार रुपये 
13 नोव्हेंबर 653 क्‍विंटल 1,088 रुपये 
26 नोव्हेंबर 750 क्‍विंटल -1,493 रुपये 
30 नोव्हेंबर 572 क्‍विंटल 1,600 रुपये 
30 डिसेंबर 330 क्‍विंटल 1,807 रुपये
31 डिसेंबर 588 क्‍विंटल 1,813 रुपये
2 जानेवारी 532 क्‍विंटल 1,700 रुपये 
4 जानेवारी 450 क्‍विंटल 1,700 रुपये 

 

मका पिकाचा हंगाम संपत आहे. गेल्या वर्षी याच काळात दर दिवशी पाच हजार क्‍विंटलपर्यंत मका यायची. आता ती केवळ 500 क्‍विंटलपर्यंत आली आहे. ऑक्‍टोबरपासून ते मार्चदरम्यान हंगाम असतो. यंदा परतीच्या पावसामुळे मक्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीच्या काळात दर कमी होता. आता त्यादृष्टीने चांगला दर आहे; मात्र आवक नाही. सध्या 1,700 ते 1,900 रुपयांपर्यंत दर देण्यात येत आहे. 
- दिलीप गांधी, अडत व्यापारी, बाजार समिती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high Rate but not production of maize