esakal | तबेल्याला आग लागून घोड्याचा होरपळून मृत्यू, दहा लाखांना केली होती खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

तबेल्याला आग लागून तेथील घोड्याचा होरपळून करुण अंत झाला.

तबेल्याला आग लागून घोड्याचा होरपळून मृत्यू, दहा लाखांना केली होती खरेदी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : तबेल्याला आग लागून तेथील घोड्याचा होरपळून करुण अंत झाला. ही गंभीर घटना २६ डिसेंबरला रात्री घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, कंत्राटदार असलेले विजयकुमार रामदास सरोदे (वय ४८, रा. सिडको, एन-८) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी २०१४ ला पंजाबी वंशाचा पांढरा घोडा दोन लाख दहा हजारांत खरेदी केला होता. घोड्यासाठी त्यांनी जाधववाडी येथे आंबेडकरनगर स्मशानभूमीमागे जागा घेतली. तेथे घोड्याचा तबेला तयार केला. तेथेच घोड्याचे संगोपन केले जात होते.

२६ डिसेंबरला सरोदे यांनी घोड्याचा चारा-पाणी दिले. त्यानंतर ते आजारी नातेवाईकाला दवाखान्यातून सुटी झाल्याने त्यांना भेटून त्यांना गंगापूर येथे सोडण्यासाठी गेले. रात्री साडेआठला ते शहरात आले. तेव्हा त्यांच्या मुलाने घोड्याला रात्रीही चारा-पाणी दिला. त्यानंतर ते मुलासोबत घरी गेले. त्यानंतर २७ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता तबेल्याच्या जवळ राहणारे सय्यद साजीद जिलानी यांचा सरोदे यांना फोन आला. त्यांनी तबेल्याला आग लागल्याचे व यात घोड्याचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर सरोदे तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घोड्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

Edited - Ganesh Pitekar