esakal | बजाजनगरामध्ये घरफोडी, दागिन्यांसह साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

रात्री बंद असलेल्या एका घराचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ४ लाख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने मिळून ६ लाख ५३ हजार ६४० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

बजाजनगरामध्ये घरफोडी, दागिन्यांसह साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद)  : रात्री बंद असलेल्या एका घराचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ४ लाख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने मिळून ६ लाख ५३ हजार ६४० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही चोरीची घटना गुरुवारी (ता.२९) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.छोटूलाल दादाजी हेमाडे (वय ४६) हे कुटुंबासह बजाजनगर येथील जय भगवान हाऊसिंग सोसायटीत घर क्रमांक ३२ मध्ये राहतात.

भोळसर महिलेने बाळाला गटाराचे पाणी पाजले अन् कडेवरूनही फेकले! पोलिस धावले, जीव वाचला

वडिलांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असल्याने ते सोमवारी (ता. २६) पत्नीसह मूळगावी खुदाने ता. साक्री जि. धुळे येथे गेले होते. तर त्यांच्या दोन्ही मुली व एक मुलगा असे तिघे पत्नीचे मामा परशुराम सावळे यांच्याकडे बजाजनगर येथे होते. त्यामुळे हेमाडे यांचे घर सोमवार ते गुरुवारपर्यंत बंद होते. गुरुवारी (ता.२९) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हेमाडे यांचा भाडेकरू ज्ञानेश्वर देवकर यांचा हेमाडे यांना फोन आला. त्यांनी चोरी झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांची घटनास्थळी धाव
बजाजनगर येथील या चोरीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ठसे तज्ञ व श्‍वान पथक मच्छिंद्र तनपुरे, के.बी.वाघुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळापासून स्वीटीने अंदाजे एक किलोमीटरपर्यंत चोरट्यांचा माग काढला. मात्र त्यानंतर श्‍वान तेथेच घुटमळल्याने पुढील मार्ग मिळाला नाही.

संपादन - गणेश पिटेकर


संपादन - गणेश पिटेकर