esakal | हैदराबादच्या भामट्यांचा औरंगाबादेत कारनामा, ट्रॅव्हल्स मालकासह ५० भाविकांना गंडविले.  
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_547.jpg

हैदराबादच्या भामट्यांनी लावला २९ लाख २५ हजारांना चुना 

हैदराबादच्या भामट्यांचा औरंगाबादेत कारनामा, ट्रॅव्हल्स मालकासह ५० भाविकांना गंडविले.  

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : सौदी अरेबियातील उमराला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स मालकाच्या मध्यस्थीने ५० भाविकांकडून २९ लाख २५ हजार पाचशे रुपये उकळण्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात हैदराबादेतील दोन भामट्यांविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल हकीम रशीद अली सय्यद आणि सय्यद फजल अब्दुल हकीम (दोघेही रा. हैद्राबाद) अशी त्या संशयित भामट्यांची नावे आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

रेल्वे स्थानक परिसरातील सय्यद अझहर सय्यद बशीर (३५, रा. प्लॉट क्र. ५१, रा. इच्छापूर्ती अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ८, जालाननगर) यांची आयेशा उमरा टुर्स एजन्सी आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये हैदराबादेतील ए टू झेड प्रायव्हेट लिमीटेडचा मालक अब्दुल हकीम त्याचा मुलगा सय्यद फजल हे दोघे सय्यद अझहर यांच्याकडे आले होते. त्यावेळी दोघांनी उमराला पाठविण्याचे पॅकेज स्वस्त दरात देतो असे म्हणून त्यांना ५० भाविकांना घेऊन जाण्याची हमी दिली होती. प्रत्येकी सुमारे ६० हजारांचे पॅकेज देण्याचे ठरले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानुसार, सय्यद अझहर यांनी प्रत्येक भाविकाकडून रक्कम जमा केल्यानंतर ती आरटीजीएसव्दारे अब्दुल हकीम व सय्यद फजल यांच्या बँक खात्यात जमा केली. यावेळी खात्यात जमा झालेली २९ लाख २५ हजार पाचशे रुपयांची रक्कम सय्यद फजल याने काढून घेतली. त्यानंतर त्याने सय्यद अझहर यांच्याशी संपर्क तोडला. गेल्या मार्च महिन्यात सय्यद अझहर यांना भामट्यांनी रकमेचा धनादेश दिला. मात्र, तो देखील बँकेत वटला नाही. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे सय्यद अझहर यांच्या लक्षात आले. त्यांना वर्षभर पैसे देण्याचे आश्वासन देत दोघांनी विश्वासघात केला. त्यावरुन मंगळवारी सय्यद अझहर यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)